मुंबई : अवयवदानाविषयी काही प्रमाणत जनजागृती वाढत असताना नुकतेच मुंबईत २८ वे अवयवदान पार पडले आहे. याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच रेल्वेच्या मुंबई सेंट्रलच्या जगजीवन राम रेल्वे रुग्णालयात हे अवयवदान पार पडले आहे. पश्चिम रेल्वेतून निवृत्त झालेल्या ६४ वर्षीय कर्मचाऱ्याने अवयवदान करुन तिघांना जीवनदान केले आहे. यात दोन मूत्रपिंड, यकृत आणि कॉर्निया दान करण्यात आले आहे.प्रकृतीविषयी समस्या उद्भवल्याने त्या व्यक्तीला ९ जुलै रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर करण्यात आलेल्या तपासणीत त्यांना हृदयाशी संबंधित विकार असल्याचे समोर आले. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात दाखल केले, १४ जुलै रोजी डॉक्टरांनी त्यांना ब्रेनडेड घोषित केले. नातेवाईकांच्या समुपदेशनानंतर अवयवदान करण्यात आले.या अवयवदानाविषयी जगजीवन राम रेल्वे रुग्णालयातील अतिरिक्त आरोग्य संचालक डॉ. एम.वेंकटेश रेड्डी यांनी सांगितले की, १६ जुलैला दोन्ही मूत्रपिंड अपोलो रुग्णालयातील रुग्णांना दान करण्यात आली. तर, यकृत केईएम रुग्णालयात पाठवण्यात आले. कॉर्निया एका नेत्रपेढीला दान केले. शिवाय, अवयवदानाची प्रक्रिया पार पडणारे जगजीवन राम रेल्वे रुग्णालय हे मुंबईतील पहिले रुग्णालय असल्याचे त्यांनी म्हटले आहे.>अवयवदानात दोन मूत्रपिंड, यकृत आणि कॉर्निया दान करण्यात आले आहे.
रेल्वेच्या रुग्णालयात पहिले अवयवदान, ६४ वर्षीय वृद्धाने दिली तिघांना नवसंजीवनी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 5:26 AM