Join us

राज्यात ६४ हजार रुग्ण उपचाराधीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 4:09 AM

मुंबई : राज्यात रविवारी ३,७१० रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत एकूण ६१,८९,९३३ रुग्णांनी कोविडवर मात केली आहे. ...

मुंबई : राज्यात रविवारी ३,७१० रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत एकूण ६१,८९,९३३ रुग्णांनी कोविडवर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८३ % एवढे झाले आहे. राज्यात ६४,२१९ रुग्ण उपचाराधीन आहेत.

राज्यात ४,७९७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, १३० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्युंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्युदर २.११ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,०९,५९,७३० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १२.५४ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ३,५९,६४२ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत, तर २,४५३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६३,९२,६६० झाली असून, मृतांचा आकडा १ लाख ३५ हजार ३९ आहे.