Join us

मुंबईत काेराेनाचे ६४३ नवे रुग्ण, ३ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मार्चपासून मुंबईत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. गेल्या ११ महिन्यांत करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे कोरोना आटोक्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मार्चपासून मुंबईत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. गेल्या ११ महिन्यांत करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे कोरोना आटोक्यात आला आहे. मुंबईत ३०० ते ४०० रुग्ण आढळून येत होते. मात्र, काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. १४ फेब्रुवारीला ६४५, १७ फेब्रुवारीला ७२१, १८ फेब्रुवारीला ७३६, १९ फेब्रुवारीला ८२३, २० फेब्रुवारीला ८९७, २१ फेब्रुवारीला ९२१, २२ फेब्रुवारीला ७६० तर यानंतर मंगळवारी ६४३ नवे रुग्ण आढळून आले. दिवसभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत किंचितशी घट झाल्याने मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला.

कोरोनाग्रस्तांचा आकडा ३ लाख २० हजार ५३१ वर पोहोचला आहे. तर मंगळवारी तीन जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ११,४४९ वर पोहोचला आहे. रुग्ण बरे होण्याची संख्या ३ लाख ६१८ वर पोहोचली आहे. सध्या ७५३६ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४ टक्के असून रुग्ण दुपटीचा कालावधी ३०५ दिवस आहे. कोरोना रुग्ण आढळून आलेल्या ५१ चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर ८१५ इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत.

....................