लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात १८ हजार पोलीस शिपाई, चालक पदांसाठी आतापर्यंत ११ लाख ८० हजार ऑनलाईन अर्ज आले आहेत. मंगळवारपर्यंत आलेल्या या अर्जांचा विचार करता एका पदासाठी ६५ उमेदवारांमध्ये स्पर्धा आहे. तांत्रिक अडचणींमुळे हजारो विद्यार्थी अजूनही अर्ज करू शकलेले नाहीत. त्यामुळे आता त्यांच्यासाठी १५ दिवसांची मुदत वाढवून देण्यात आली आहे.
भरती प्रक्रियेतील ऑनलाईन अर्ज करताना तांत्रिक अडचणी येत असल्याने अर्ज भरण्याची मुदत गृहविभागाने १५ दिवसांनी वाढवण्याचा निर्णय घेतला. ३० नोव्हेंबर हा अर्ज भरण्यासाठी शेवटचा दिवस होता. पोलीस भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरताना सर्व्हर स्लो होणे किंवा डाऊन होणे, पेमेंट गेटवे स्लो असणे यासारख्या तांत्रिक अडचणींमुळे इच्छूक अनेक उमेदवार अर्ज भरू शकले नाहीत.
मागील वर्षीचे क्रिमिलेयर ग्राह्यn अर्ज करताना नॉन क्रिमिलेयरचे कोणते प्रमाणपत्र सादर करावे याबाबतही संभ्रम होता तो संभ्रम दूर करताना मागील वर्षीचे क्रिमिलेयर यावर्षी घ्यावे लागते. n त्यामुळे मागील वर्षीचे क्रिमिलेयर ग्राह्य धरले जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर या भरती प्रक्रियेत भूकंपग्रस्तांचाही समावेश करण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
७५ हजार पदांच्या भरतीचा दर आठवड्याला आढावा
राज्यात ७५ हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती देण्यास या भरती प्रक्रियेचा प्रत्येक आठवड्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत आढावा घेतला जाणार आहे.
प्रत्येक बैठकीत कुठल्या विभागाने पदे भरण्यासाठी केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेतला जाईल. पदभरती संदर्भात मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत १४ विभागांचे सादरीकरण करण्यात आले.
लिपिक टंकलेखक पदासाठी जाहिरात जानेवारीमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यभरातील लिपिक टंकलेखक या पदासाठी पदभरती होणार आहे. यासदंर्भातील जाहिरात जानेवारी २०२३ मध्ये पहिल्या आठवड्यात प्रसिध्द होणार आहे. या अनुषंगाने १५ डिसेंबरपर्यंत सर्व विभागांनी आपली मागणीपत्र आयोगाकडे पाठवलीच पाहिजेत, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.