ठाणो : नवी मुंबईत 2क्12 मध्ये झालेल्या कार अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पांडुरंग शिंदे यांच्या कुटुंबीयांना अखेर नुकसानभरपाईपोटी 65 लाख रुपये देण्याचे आदेश ठाण्यात झालेल्या लोक अदालतीने दिले आहेत. येत्या चार आठवडय़ांत पांडुरंग यांच्या पत्नी वंदना शिंदे यांना ही भरपाई द्यावी, अशा सूचना गाडीचा मालक आणि आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्सला देण्यात आल्या आहेत. आर. एस. चहल, एम. एन. बेलोसे आणि एस. पी. कामथ यांच्या पॅनलने हे आदेश दिले.
शिंदे हे नवी मुंबईतील महानगर गॅस लिमिटेड या कंपनीत व्यवस्थापक पदावर कार्यरत होते. 4 सप्टेंबर 2क्12 रोजी ते आपले सहकारी एस. शर्मा यांच्या कारने घरी येत होते. कार शर्मा यांची होती आणि तेच ती चालवत होते. तेव्हा कार रस्त्यावरच्या लोखंडी दुभाजकावर आदळली आणि पांडुरंग जखमी झाले. त्यात त्यांचा मृत्यू झाला.
पांडुरंग हे त्यांच्या घरातील एकमेव कमवती व्यक्ती होते आणि त्यांना दरमहा 5क् हजार रुपये वेतन मिळत होते. त्यांच्या पश्चात पत्नी वंदना, मुलगा अक्षय (17) मुलगी निकिता (13) आणि त्यांची आई अनसूया (7क्) यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे याची नुकसानभरपाई मिळावी म्हणून त्यांनी लोक अदालतमध्ये धाव घेतली होती. त्यांनी एक कोटीची नुकसानभरपाई देण्यात यावी, असा दावा केला होता. परंतु, सरतेशेवटी त्यांना 65 लाख देण्याचे आदेश लोक अदालतीने दिल्याचे त्यांचे वकील जी. ए. विनोद यांनी सांगितले.