तलावांमध्ये ६५ टक्के जलसाठा जमा; चिंता कमी होतेय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 02:14 AM2020-08-15T02:14:09+5:302020-08-15T02:14:46+5:30
पाणीकपात रद्द होण्याची चिन्हे
मुंबई : गेले काही दिवस सलग कोसळणारा मुसळधार पाऊस मुंबईकरांचे पाण्याचे टेन्शन दूर करण्याची चिन्हे आहेत. गेल्या २४ तासांमध्ये तलावातील पाण्याची पातळी तब्बल ६७ हजार दशलक्ष लीटरने वाढली आहे. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व तलावांमध्ये आता ६५ टक्के जलसाठा जमा झाला आहे.
जून आणि जुलै हे दोन पावसाळी महिने कोरडे गेल्यामुळे मुंबईतील पाणी टेन्शन वाढले. मुंबईला पाणीपुरवठा करणाºया तलावांमध्ये जुलै अखेरीस जेमतेम ३४ टक्के जलसाठा जमा होता. मात्र गेल्या २२ दिवसांच्या कालावधीत तलाव क्षेत्रात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे आता तब्बल नऊ लाख ३७ हजार दशलक्ष लीटर जलसाठा जमा झाला आहे. मुंबईला वर्षभर पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी तलाव क्षेत्रात एकूण १४ लाख ४७ हजार दशलक्ष लीटर जलसाठा असणे अपेक्षित आहे. ५ आॅगस्टपासून महापालिकेने संपूर्ण मुंबईत २० टक्के पाणीकपात लागू केली आहे. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये तलावाच्या पातळीत वाढ होत असल्याने पुढच्या महिन्यात आढावा घेऊन ही पाणीकपात रद्द होण्याची शक्यता आहे.
जलसाठ्याची आकडेवारी (मीटर्समध्ये )
तलाव कमाल किमान उपयुक्त सध्या
साठा (दशलक्ष)
मोडक सागर १६३.१५ १४३. २६ ९९३०० १५९.४९
तानसा १२८.६३ ११८.८७ ९५०४० १२५.८७
विहार ८०.१२ ७३.९२ २७६९८ ८०.३९
तुळशी १३९.१७ १३१.०७ ८०४६ १३९.३३
अप्पर वैतरणा ६०३.५१ ५९७.०२ १०७७७७ ५९९.७०
भातसा १४२.०७ १०४.९० ४६२४६७ १३१.९४
मध्य वैतरणा २८५.०० २२०.०० १३६९९७ २७५.१७
१४ आॅगस्ट रोजी तलावांमध्ये जलसाठा
वर्ष जलसाठा टक्के
(दशलक्ष लीटर)
२०२० - ९३७३२६ ६४.७६
२०१९ - १३४३५८९ ९२.८३
२०१८- १२८७४३३ ८८.९५