Corona Vaccination: कोरोनाची लस घेतल्यानंतर मुंबईतील 65 वर्षीय वृद्ध खुर्चीवरून कोसळले; ICU मध्ये निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 10:42 AM2021-03-09T10:42:20+5:302021-03-09T10:52:57+5:30

Corona Vaccine Oxford-AstraZeneca vaccine Covishield: कोरोना लस सुरक्षित असल्याचा दावा सरकार आणि कोरोना लस बनविणाऱ्या कंपन्या करत आहेत. गेल्या आठवड्यापासून ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लस देण्यास सुरुवात झाली आहे.

65-year-old Goregaon man collapsed on a chair after taking first corona vaccine dose, died | Corona Vaccination: कोरोनाची लस घेतल्यानंतर मुंबईतील 65 वर्षीय वृद्ध खुर्चीवरून कोसळले; ICU मध्ये निधन

Corona Vaccination: कोरोनाची लस घेतल्यानंतर मुंबईतील 65 वर्षीय वृद्ध खुर्चीवरून कोसळले; ICU मध्ये निधन

googlenewsNext

मुंबई : कोरोना (corona vaccine) लस घेतल्यानंतरचे परिणाम काही नागरिकांना जाणवू लागले आहेत. ठाणे, भिवंडीत सुरुवातीला कोरोना लस घेतलेल्या दोन जणांचा मृत्यू झाला होता. आता गोरेगावमध्ये 65 वर्षीय वृद्धाचा कोरोना लस घेतल्यानंतर दीड तासात मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. (65-year-old Goregaon resident collapsed within minutes of receiving the first dose of the corona vaccine.)


कोरोना लस सुरक्षित असल्याचा दावा सरकार आणि कोरोना लस बनविणाऱ्या कंपन्या करत आहेत. गेल्या आठवड्यापासून ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लस देण्यास सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यापासून राज्यातील नेते शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी देखील लस (Corona vaccination Drive) टोचून घेतली आहे. यामुळे अनेक नागरिकांनीही कोरोना लस टोचून घेण्यास पुढाकार घेतला आहे. मोठ्या प्रमाणावर यासाठी नोंदणी केली जात आहे. मात्र, अशा घटनांमुळे अनेकजण धास्तावण्याची शक्यता आहे. 


गोरेगावचे रहिवासी असलेल्या एका 65 वर्षीय वृद्धाने सोमवारी जोगेश्वरीच्या मिल्लत नर्सिंग होममध्ये कोरोनाची लस घेतली. मात्र, त्यानंतर काही मिनिटांतच ते खूर्चीवरून कोसळले. यानंतर त्यांना आयसीयूमध्ये भरती करण्यात आले. मात्र, लस घेतल्यानंतर अवघ्या दीड तासातच त्यांची प्राणज्योत मालवली. मुंबईत अशाप्रकारचे हे पहिलेच प्रकरण आहे.  महापालिकेच्या आरोग्य खात्याने लगेचच या व्यक्तीचा मृत्यू हा कोरोना लसीमुळे झाला असा संबंध जोडण्यास नकार दिला आहे. 


जोगेश्वरीच्या लसीकरण केंद्रामध्ये दुपारी 3.37 वाजता या वृद्धाला लस टोचण्यात आली. यानंतर लगेचच त्यांना भोवळ आल्याने ते खूर्चीतच कोसळले. ते 3.30 वाजता केंद्रात पोहोचले होते. त्यांना सीरमच्या कोविशिल्ड लसीचा 0.5 मिलीचा डोस (Corona Vaccine Oxford-AstraZeneca vaccine Covishield) देण्यात आला होता. त्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयाशी संबंधीत विकार असे गंभीर आजार होते, असे मुंबई पालिकेने सांगितले आहे. 


त्यांना कोरोना लस दिल्यानंतर अ‍ॅनाफिलेक्टिक शॉक बसल्याचे सध्या सांगू शकत नाही. लसीकरण समिती (एईएफआय) या घटनेची चौकशी करेल, त्यानंतरच काही सांगता येईल असे पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले. या वृद्धाचे आयसीयूमध्ये सायंकाळी 5 वाजता निधन झाले. 

देशभरात 40 घटना
कोरोना लस दिल्यानंतर देशभरात अशाप्रकारच्या 40 घटनांची नोंद झाली आहे. ही लसीकरणाच्या संख्येपेक्षा खूपच कमी आहे. यापैकी अनेकांना दुर्धर आजार होते. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार यापैकी एकाचाही मृत्यू हा कोरोना लसीमुळे झालेला नाहीय. गेल्या आठवड्यात भिवंडीमध्ये 40 वर्षीय आरोग्य कर्मचाऱ्याचा कोरोनाचा दुसरा डोस घेतल्यानंतर मृत्यू झाला होता. 

Read in English

Web Title: 65-year-old Goregaon man collapsed on a chair after taking first corona vaccine dose, died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.