काेराेनाची लस घेतल्यानंतर ६५ वर्षींय वृद्धाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:06 AM2021-03-10T04:06:42+5:302021-03-10T04:06:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : काेराेना प्रतिबंधात्मक लस घेतल्यानंतर एका ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. मुंबईतील ही पहिली घटना ...

A 65-year-old man dies after being vaccinated against caries | काेराेनाची लस घेतल्यानंतर ६५ वर्षींय वृद्धाचा मृत्यू

काेराेनाची लस घेतल्यानंतर ६५ वर्षींय वृद्धाचा मृत्यू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : काेराेना प्रतिबंधात्मक लस घेतल्यानंतर एका ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. मुंबईतील ही पहिली घटना आहे, जिथे लस घेतल्यानंतर लगेच मृत्यू झाला. पालिका आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे खरे कारण समजेल.

गोरेगावमध्ये राहणाऱ्या नागरिकाने साेमवारी अंधेरी पश्चिमेतील मिल्लत डायलिसिस सेंटरमध्ये लस घेतली. त्यानंतर लगेचच ते बेशुद्ध पडले. त्यांना तातडीने आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. मात्र संध्याकाळी पाच वाजता त्यांचा मृत्यू झाला.

पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमरे यांनी या वृत्ताला दुजोरा देत सांगितले की, या व्यक्तीला मधुमेहासह इतर आजार होते. मात्र, मृत्यूमागील कारण लस आहे किंवा आजार, हे तपासानंतरच कळेल. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर ताे एईएफआय समितीसमोर ठेवला जाईल, त्यानंतर समिती निर्णय घेईल.

आतापर्यंत मुंबईत चार लाख लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले असून, त्यातील सुमारे ४०० जणांना सौम्य दुष्परिणामांना सामोरे जावे लागले. शिवाय, काही जणांना रुग्णालयात दाखल करावे लागल्याची माहिती पालिकेच्या आराेग्य विभागाने दिली. तर देशस्तरावर आतापर्यंत लस घेतल्यानंतर अन्य काही कारणांमुळे ४० मृत्यूंची नोंद झाली आहे. परंतु, केंद्र शासनाच्या माहितीनुसार, कोणत्याही मृत्यूचे थेट कारण लसीकरण नाही असा खुलासाही त्यांनी केला.

* भिवंडी येथेही लस घेतल्यानंतर मृत्यू

भिवंडी येथे २ मार्च राेजी कोरोनाची दुसरी लस घेणाऱ्या व्यक्तीला चक्कर आल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे निदान केले. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. सुखदेव किर्दत (वय ४४) असे मृत व्यक्तीचे नाव हाेते. ते ठाण्यातील मनोरमा नगर येथील रहिवासी हाेते. भिवंडीतील एका खासगी डॉक्टरकडे वाहनचालक म्हणून काम करत होते.

* घाबरू नका; लस घ्या, डॉक्टरांचे आवाहन

एखाद्या व्यक्तीला लस घेतल्यानंतर हलका ताप, डोकेदुखी किंवा अंगदुखी जाणवू शकते. साधारणत: कोणतीही लस घेतल्यानंतर अशी लक्षणे जाणवू शकतात. परंतु, यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. जगात काेरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यावर किरकोळ रिॲक्शन झाल्याच्या घटना काही ठिकाणी घडल्या. मात्र, अशी घटना लाखांमध्ये एखादीच असून, मनात कोणतीही भीती न बाळगता निर्धास्तपणे लस घ्या. लस घेण्यात कोणताही धाेका नाही. लस घेतल्यावर दोन ते तीन दिवस आराम करा. सकस आहार घ्या. भरपूर पाणी प्या, असे आवाहन डॉ. रामचंद्र शहा यांनी केले.

................................................................

Web Title: A 65-year-old man dies after being vaccinated against caries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.