Join us

मुंबईत ६५४ रुग्ण, नऊ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2021 4:05 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईत शुक्रवारी ६५४ नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. तसेच रुग्णवाढीचा दैनंदिन सरासरी दर आता ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईत शुक्रवारी ६५४ नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. तसेच रुग्णवाढीचा दैनंदिन सरासरी दर आता ०.२१ टक्के एवढा आहे. दिवसभरात ४७२ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे आतापर्यंत ९३ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर दिवसभरात नऊ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा १११७१ एवढा आहे. तर मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३६४ दिवसांनंतर दुप्पट होत आहे.

महापालिकेच्या अहवालानुसार सध्या सात हजार ९२७ सक्रिय रुग्ण आहेत. तर आतापर्यंत दोन ७७ हजार ६६४ रुग्ण बरे झाले आहेत. शुक्रवारी मृत झालेल्या नऊ कोरोना रुग्णांपैकी पाच रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. एकूण मृत्यूंपैकी सहा रुग्ण पुरुष आणि तीन रुग्ण महिला होत्या.

राज्यभरात ३,६९३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद

मुंबई : राज्यभरात शुक्रवारी ३,६९३ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली दिवसभरात २,८९० रुग्ण बरे झाले, तर ७३ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. राज्यात ५१,८३८ इतके सक्रिय रुग्ण आहेत. सध्या राज्यातील मृत्युदर २.५५ टक्के एवढा आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७५ टक्के इतके आहे. राज्यभरात सध्या २ लाख ४२ हजार ५८५ व्यक्ती होम क्वारंटाइन, तर ३ हजार १५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.