मीरा रोड, भार्इंदर रेल्वे स्थानकांतील ६६ सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित
By admin | Published: July 11, 2015 11:30 PM2015-07-11T23:30:05+5:302015-07-11T23:30:05+5:30
मीरा रोड व भार्इंदर रेल्वे स्थानकांत बसविण्यात आलेल्या ६६ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे उद्घाटन शुक्रवारी खासदार राजन विचारे यांच्या हस्ते करण्यात आले.
भार्इंदर : मीरा रोड व भार्इंदर रेल्वे स्थानकांत बसविण्यात आलेल्या ६६ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे उद्घाटन शुक्रवारी खासदार राजन विचारे यांच्या हस्ते करण्यात आले. यात मीरा रोडच्या १८ आणि भार्इंदर स्थानकातील ४८ कॅमेऱ्यांचा समावेश आहे. या वेळी त्यांनी स्थानकातील समस्यांची पाहणी करून त्या त्वरित मार्गी लावण्यासाठी उपस्थित अधिकाऱ्यांना त्यांनी निर्देश दिले. या प्रसंगी पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक डेला, विभागीय व्यवस्थापक अशोक तिवारी, शैलेंद्रकुमार, महापौर गीता जैन आदींसह मुंबई रेल्वे विकास महामंडळ (एमआरव्हीसी)चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या पाहणीदरम्यान त्यांनी भार्इंदर रेल्वे फलाट क्र. १ ची उंची वाढविल्यामुळे तेथे फीत कापून कोनशिलेचे उद्घाटन केले. फलाटांसह पादचारी पूल व तिकीट खिडक्यांजवळ लावण्यात आलेले जुने इंडिकेटर्स त्वरित बदलून तेथे नवीन इंडिकेटर्स लावण्याचे निर्देश दिले. मीरा रोड स्थानकात १ एस्कलेटर बसविण्यास मंजुरी मिळाली असल्याने त्याची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच भार्इंदर रेल्वे स्थानकात ४ एस्कलेटर व २ लिफ्ट एमआरव्हीसीद्वारे बसविण्यात येणार असल्याची माहिती उपस्थित रेल्वे अधिकाऱ्याकडून देण्यात आली. (प्रतिनिधी)