राज्यात रविवारी ६६ हजार १९१ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:06 AM2021-04-26T04:06:35+5:302021-04-26T04:06:35+5:30

मुंबई : राज्यात रविवारी पुन्हा एकदा दैनंदिन रुग्णसंख्येने साठ हजारांचा टप्पा ओलांडला, तर दुसरीकडे दिवसभरात झालेल्या मृत्यूंनी पुन्हा उच्चांक ...

66 thousand 191 patients in the state on Sunday | राज्यात रविवारी ६६ हजार १९१ रुग्ण

राज्यात रविवारी ६६ हजार १९१ रुग्ण

Next

मुंबई : राज्यात रविवारी पुन्हा एकदा दैनंदिन रुग्णसंख्येने साठ हजारांचा टप्पा ओलांडला, तर दुसरीकडे दिवसभरात झालेल्या मृत्यूंनी पुन्हा उच्चांक गाठला आहे. राज्यात दिवसभरात ६६ हजार १९१ रुग्ण आणि ८३२ मृत्यूंची नोंद झाली आहे. यापूर्वी, २३ एप्रिल रोजी दिवसभरात ७७३ मृत्यूंची नोंद झाली होती. राज्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या ४२ लाख ९५ हजार २७ झाली असून बळींचा आकडा ६४ हजार ७६० झाला आहे.

सध्या राज्यात ६ लाख ८ हजार ३५४ रुग्ण उपचाराधीन आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यात दिवसभरात ६१ हजार ४५० रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण ३५ लाख ३० हजार ६० रुग्णांनी कोरोनाला हरविले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२.१९ टक्के झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ५७ लाख ४९ हजार ५४३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६.६८ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४२ लाख ३६ हजार ८२५ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत, तर २९ हजार ९६६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

राज्याचा मृत्युदर १.५१ टक्के आहे. राज्यात दिवसभरात नोंद झालेल्या ८३२ मृत्यूंपैकी ३६० मृत्यू हे मागील ४८ तासांतील तर २४४ हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित २२८ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक काळापूर्वीचे आहेत. या ८३२ मृत्यूंमध्ये मुंबई ६४, ठाणे १३, कल्याण-डोंबिवली मनपा २१, उल्हासनगर मनपा ९, भिवंडी निजामपूर मनपा २, वसई-विरार मनपा १, रायगड २३, पनवेल मनपा ११, नाशिक २९, नाशिक मनपा २८, अहमदनगर २८, अहमदनगर मनपा १६, जळगाव १२, जळगाव मनपा ३, नंदूरबार ४, पुणे १५, पुणे मनपा ४७, पिंपरी चिंचवड मनपा ७, सोलापूर ३४, सोलापूर मनपा २८, सातारा १०, कोल्हापूर १, कोल्हापूर मनपा १, सांगली १४, सिंधुदुर्ग १०, रत्नागिरी १६, औरंगाबाद ६, औरंगाबाद मनपा ३९, जालना १७, परभणी २, परभणी मनपा ३, लातूर १७, लातूर मनपा ५, उस्मानाबाद २०, बीड ७, नांदेड ४४, नांदेड मनपा १५, अकोला ५, अकोला मनपा ४, अमरावती १४, अमरावती मनपा ४, यवतमाळ ४५, वाशिम ४, नागपूर ६९, वर्धा ७, भंडारा ९, गोंदिया १०, चंद्रपूर १९, चंद्रपूर मनपा ७, गडचिरोली ५ इ. रुग्णांचा समावेश आहे.

Web Title: 66 thousand 191 patients in the state on Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.