Join us

पाच वर्षांत ६६ कर्मचाऱ्यांना क्षयरोग; शिवडी येथील क्षयरोग रुग्णालयातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 3:33 AM

शिवडी येथील क्षयरोग रुग्णालयात मागील पाच वर्षांच्या कालावधीत तब्बल ६६ कर्मचा-यांना क्षयरोगाची बाधा झाली आहे. माहितीच्या अधिकारात विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना रुग्णालय प्रशासनाने ही माहिती दिली आहे.

मुंबई : शिवडी येथील क्षयरोग रुग्णालयात मागील पाच वर्षांच्या कालावधीत तब्बल ६६ कर्मचा-यांना क्षयरोगाची बाधा झाली आहे. माहितीच्या अधिकारात विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना रुग्णालय प्रशासनाने ही माहिती दिली आहे.पाच वर्षांच्या कालावधीत रुग्णालयातील दोघा डॉक्टरांसह ६६ कर्मचाºयांना क्षयरोगाची बाधा झाली. यातील १७ कर्मचारी दगावले असून, ३९ कर्मचारी क्षयरोगमुक्त झाले आहेत. तर १० जणांवर अद्याप उपचार सुरू असल्याचे रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. ललित आनंदे यांनी माहिती अधिकाराखाली विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले. २०१३ ते २०१८ या कालावधीत ४९ कर्मचारी, ११ नर्स, दोन डॉक्टर आणि एक लॅब टेक्निशिअन, एक रेडिओग्राफर, एक फार्मसिस्ट आणि एका अधिकाºयाला क्षयरोगाची बाधा झाली. या पाच वर्षांपैकी एकट्या २०१३ साली तब्बल ३२ कर्मचाºयांना क्षयरोगाची बाधा झाली आणि दहा जण दगावले. दरवर्षी रुग्णालयात सरासरी १४ कर्मचाºयांना क्षयरोगाची लागण होत असून ही गंभीर बाब असल्याचे याबाबत माहिती मागविणारे चेतन कोठारी यांनी सांगितले.- कर्मचाºयांना क्षयरोगाची बाधा होऊ नये, यासाठी काळजी घेतली जाते. नियमित तपासण्या होतात. त्यातूनही आजाराची बाधा झाल्यास रुग्णालय प्रशासनाकडून बाधितांची योग्य निगा राखली जाते. महापालिकेकडून वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती करतानाच उपचारादरम्यान भरपगारी रजा दिली जाते, अशी माहिती साहाय्यक वैद्यकीय अधिकारी संतोष रेवणकर यांनी दिली.

टॅग्स :मुंबई