राज्यात दिवसभरात ६ हजार ६०० जणांना कोरोनाची बाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:07 AM2021-07-31T04:07:07+5:302021-07-31T04:07:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात शुक्रवारी ६ हजार ६०० नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, ७ हजार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात शुक्रवारी ६ हजार ६०० नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, ७ हजार ४३१ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यभरात सध्या ७७ हजार ४९४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
आजच्या ६ हजार ६०० नवीन रुग्णांच्या नोंदीनंतर आतापर्यंतच्या कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ६२ लाख ९६ हजार ७५६ इतकी झाली आहे. तर, एकूण ६० लाख ८३ हजार ३१९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.६१ टक्के एवढे झाले आहे, तर दुसरीकडे आज २३१ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाल्याने आतापर्यंतच्या कोरोनाबळींची संख्या १ लाख ३२ हजार ५६६ इतकी आहे. सध्या राज्यातील मृत्युदर २.१ टक्के आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी ७७ लाख ६० हजार ८६२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२ लाख ९६ हजार ७५६ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४ लाख ७९ हजार ५५३ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत, तर ३ हजार २८९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.