राज्यात २४ तासात ६६ हजार ३५८ रुग्ण तर ८९५ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:07 AM2021-04-28T04:07:12+5:302021-04-28T04:07:12+5:30

पुन्हा दैनंदिन मृत्यूचा उच्चांक लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात मागील २४ तासात ६६ हजार ३५८ रुग्णांचे निदान झाले ...

66,358 patients and 895 deaths in 24 hours in the state | राज्यात २४ तासात ६६ हजार ३५८ रुग्ण तर ८९५ मृत्यू

राज्यात २४ तासात ६६ हजार ३५८ रुग्ण तर ८९५ मृत्यू

Next

पुन्हा दैनंदिन मृत्यूचा उच्चांक

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात मागील २४ तासात ६६ हजार ३५८ रुग्णांचे निदान झाले आहे, तर दिवसभरात ८९५ मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात पुन्हा एकदा दैनंदिन मृत्यूच्या उच्चांकाची नोंद झाली आहे. यापूर्वी, २५ एप्रिल रोजी दिवसभरात ८३२ मृत्यू झाले होते. आता राज्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या ४४ लाख १० हजार ८५ झाली असून बळींचा आकडा ६६ हजार १७९ झाला आहे. सध्या ६ लाख ७२ हजार ४३४ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ८३.२१ टक्के असून मृत्यूदर १.५ टक्के आहे. दिवसभरात ६७ हजार ७५२ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण ३६ लाख ६९ हजार ५४८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ६२ लाख ५४ हजार ७३७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६.८० टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ४२ लाख ६४ हजार ९३६ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर ३० हजार १४६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात अन्य कारणांमुळे १ हजार ९२४ रुग्णांचा मृत्यू ओढावला आहे. मंगळवारी नोंद झालेल्या ८९५ मृत्यूपैकी ३९२ मृत्यू हे मागील ४८ तासांतील तर १७९ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ३२४ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक काळापूर्वीचे आहेत. या ८९५ मृत्यूमध्ये मुंबई ५९, ठाणे १, नवी मुंबई मनपा १०, कल्याण डोंबिवली मनपा १८, भिवंडी निजामपूर मनपा २, मीरा भाईंदर मनपा ५, वसई विरार मनपा ५, रायगड १५, पनवेल मनपा ३, नाशिक ३०, नाशिक मनपा ३३, मालेगाव मनपा ६, अहमदनगर ३०, अहमदनगर मनपा १७, धुळे १, जळगाव ६, जळगाव मनपा ४, नंदूरबार ८, पुणे १२, पुणे मनपा ६२, पिंपरी चिंचवड मनपा ६, सोलापूर ११, सोलापूर मनपा १३, सातारा १८, कोल्हापूर ३, कोल्हापूर मनपा ३, सांगली १३, सांगली मिरज कुपवाड मनपा ५, सिंधुदुर्ग १२, रत्नागिरी १५, औरंगाबाद १९, औरंगाबाद मनपा १४३, जालना ४, हिंगोली ६, परभणी ११, लातूर २३, लातूर मनपा ४, उस्मानाबाद ३२, बीड १०, नांदेड १६, नांदेड मनपा ९, अकोला २, अमरावती १४, अमरावती मनपा ३, यवतमाळ २७, बुलढाणा ६, वाशिम १०, नागपूर ११, नागपूर मनपा ५२, वर्धा १५, भंडारा १८, गोंदिया ७, चंद्रपूर ७, गडचिरोली १५ इ. रुग्णांचा समावेश आहे.

Web Title: 66,358 patients and 895 deaths in 24 hours in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.