Join us  

अपघातप्रकरणी ६७ लाखांची नुकसानभरपाई

By admin | Published: May 08, 2016 3:51 AM

कार अपघातात मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या विधवा पत्नीला मोटार लवादाने दिलेल्या नुकसानभरपाईत उच्च न्यायालयाने दुप्पट वाढ करत इन्शुरन्स कंपनीला ६७ लाख ९७ हजार रुपये देण्याचे

मुंबई : कार अपघातात मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या विधवा पत्नीला मोटार लवादाने दिलेल्या नुकसानभरपाईत उच्च न्यायालयाने दुप्पट वाढ करत इन्शुरन्स कंपनीला ६७ लाख ९७ हजार रुपये देण्याचे आदेश दिले. ही रक्कम चार महिन्यांत जमा करण्याचा आदेशही उच्च न्यायालयाने इन्शुरन्स कंपनीला दिला.अपघातात मृत पावलेल्या समीर पारेख (२९) यांच्या पत्नी चैत्राली पारेख व समीर यांच्या आई- वडिलांना ३२ लाख ७३ हजार ५०० रुपये नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश मोटार लवादाने युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि.ला दिले. या निर्णयाविरुद्ध इन्शुरन्स कंपनीने उच्च न्यायालयात अपील केले. इन्शुरन्स कंपनीच्या म्हणण्यानुसार, समीर यांच्या दुर्लक्षपणामुळे हा अपघात झाला आहे. त्यामुळे समीर यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई मिळू शकत नाही. चैत्राली यांनी मोटार लवादापुढे केलेल्या तक्रारीनुसार, २१ एप्रिल २००१ रोजी समीर सँट्रो कारमधून माहीम कॉजवेच्या दिशेने जात असताना चुकीच्या दिशेने येणाऱ्या टाटा सुमोने सँट्रोला धडक दिली. त्यापाठोपाठ वॅगन-आरनेही सँट्रोला धडक दिली. त्यामुळे समीर यांना कारच्या बाहेर येता आले नाही. त्यानंतर त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला.मोटार लवादानेही दुर्लक्ष झाल्याचे म्हणत समीर यांच्या पालकांना आणि विधवा पत्नीला ३२ लाख ७३ हजार ५०० रुपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश इन्शुरन्स कंपनीला दिला. मोटार लवादाच्या या निर्णयाला इन्शुरन्स कंपनीने उच्च न्यायालयात आव्हान दिले. (प्रतिनिधी)