Join us

डायल ११२ साठी अधिकाऱ्यांची ६८ पदे मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत पोलीस सेवा उपलब्ध करून देणाऱ्या डायल ११२ प्रकल्पाचे काम पूर्ण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत पोलीस सेवा उपलब्ध करून देणाऱ्या डायल ११२ प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांची ६८ पदे मंजूर करण्यात आली आहेत. अन्य पोलीस घटकांतून नवी मुंबई व नागपूर येथील केंद्रात स्थानांतर करण्याला गृहविभागाने हिरवा कंदील दाखविला आहे.

१ अधीक्षक, ४ उपाधीक्षकांसह अन्य अधिकारी दर्जाचा त्यामध्ये समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले. नागरिकांना अत्यावश्यक सेवेसाठी १०० क्रमांकाच्या जोडीला आपत्कालीन प्रतिसादासाठी डायल ११२ हा नंबर कार्यान्वित होत आहे. या प्रकल्पासाठी नवी मुंबईत प्राथमिक संपर्क केंद्र व नागपूर येथे द्वितीय संपर्क केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. सध्या या केंद्रातून प्रायोगिक तत्त्वावर सेवा सुरू असून, त्याठिकाणी कंपनीकडून सेवा दिली जात आहे. त्यावर नियंत्रण करण्यासाठी ६८ अधिकाऱ्यांची पदे आवश्यक होती. त्यापैकी एक अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याची ४५ पदे नवी मुंबईत, तर नागपूरमध्ये २३ पदांची आवश्यकता होती. त्यामुळे या ठिकाणी अन्य पोलीस घटकांतून ही पदे स्थानांतर करण्याचा प्रस्ताव पोलीस मुख्यालयातून गृहविभागाकडे पाठविला होता.