Join us

कोविड संदर्भात राज्यात ६९ हजार गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 3:22 AM

विविध गुन्ह्यांसाठी २ कोटी ६३ लाख रुपयांचा दंड आकारला, अशी माहिती पोलीस विभागाने दिली.

मुंबई : राज्यात लॉकडाउनच्या काळात २२ मार्च ते २४ एप्रिल या कालावधीत कलम १८८ नुसार ६९,३७४ गुन्हे दाखल झाले असून १४,९५५ व्यक्तींना अटक करण्यात आली. विविध गुन्ह्यांसाठी २ कोटी ६३ लाख रुपयांचा दंड आकारला, अशी माहिती पोलीस विभागाने दिली.१०० नंबरवर ७७,६७० फोन आले, त्याची योग्य ती दखल घेण्यात आली. हातावर क्वॉरंटाइनचा शिक्का असलेल्या ६०२ व्यक्तींना शोधून विलगीकरण कक्षात पाठवले. अवैध वाहतूक करणाऱ्या १०८४ वाहनांवर गुन्हे दाखल झाले व ४५,१६८ वाहने जप्त केली. परदेशी नागरिकांवर व्हिसा उल्लंघनाचे १५ गुन्हे राज्यभरात नोंद झाले.पोलिसांवरील हल्ला प्रकरणेपोलिसांवर हल्ला होण्याच्या १४८ घटनांची नोंद झाली असून यात ४७७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. कोरोनाशी मुकाबला करताना दुर्दैवाने १५ पोलीस अधिकारी व ८१ पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यापैकी तीन पोलीस अधिकारी व चार कर्मचारी कोरोनामुक्त झाले असून उरलेल्या १२ पोलीस अधिकारी व ७७ पोलीस कर्मचारी यांच्यावर उपचार सुरू आहेत.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या