मुंबई: मुंबई पोलिसांनी गेल्या वर्षभरात शहर व उपनगरातून तब्बल ६९८ किलो विविध अमलीपदार्थ जप्त केले आहेत. त्याची किंमत १२ कोटी २६ लाख आहे. त्यात १८ हजार ४४५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. २० हजार ३२ जणांना अटक करण्यात आली आहे. ३१ डिसेंबरमुळे उद्याही मोठ्या प्रमाणात अशा प्रकारची कारवाई होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. १ जानेवारी ते २९ डिसेंबर या कालावधीत केलेल्या कारवाईची माहिती अमलीपदार्थ विरोधी पथकाचे उपायुक्त नाईकनवरे यांनी दिली. यामध्ये ६९८ किलो पदार्थांपैकी सर्वाधिक ४२२ किलो गांजा जप्त केला आहेत, तर हेरॉईन, एमडी व चरस अनुक्रमे २३३, १६ व २४ किलो जप्त करण्यात आले आहे, तर १ किलो कोकेन पकडले आहे. (प्रतिनिधी)
वर्षभरात ६९८ किलो अमलीपदार्थ जप्त
By admin | Published: December 31, 2015 12:18 AM