Join us

मल्टिप्लेक्स चालकांना ७ दिवसांची मुदत; मनसेचा ‘कानचेक’ आंदोलनाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2018 4:05 AM

प्रेक्षकांना बाहेरील खाद्यपदार्थ चित्रपटगृहामध्ये नेण्यास मज्जाव करणे आणि खाद्यपदार्थांची वाढीव किमतीने विक्री करण्याविरोेधातले आंदोलन मनसेने आता परत सुरू केले आहे.

मुंबई : प्रेक्षकांना बाहेरील खाद्यपदार्थ चित्रपटगृहामध्ये नेण्यास मज्जाव करणे आणि खाद्यपदार्थांची वाढीव किमतीने विक्री करण्याविरोेधातले आंदोलन मनसेने आता परत सुरू केले आहे. लालबागच्या जयहिंद चित्रपटगृहामध्ये शुक्रवारी मनसे कार्यकर्त्यांनी थिएटर मॅनेजरला निवेदन दिले. ७ दिवसांत या सर्व गोष्टींमध्ये बदल न झाल्यास ‘कानचेक’ आंदोेलन केले जाईल, असे मनसैनिकांनी ठणकावून सांगितले.‘मल्टिप्लेक्समध्ये नियमांना फासला हरताळ’ अशा आशयाखाली ‘लोकमत’ने गुरवारी मुंबईतील महत्त्वाच्या मल्टिप्लेक्समध्ये रिअ‍ॅलिटी चेक केला होता. या बातमीचीदखल घेऊन मनसे कार्यकर्त्यांनी शुक्रवारी जयहिंद चित्रपटगृहामध्ये धडक दिली.भायखळा मनसेचे विभाग अध्यक्ष विजय लिपारे यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता जयहिंद चित्रपटगृहामध्ये धडक देत मॅनेजरचीभेट घेतली. जयहिंद चित्रपटगृहामध्ये येत्या ७ दिवसांत मल्टिप्लेक्समध्येयेणाऱ्या प्रेक्षकांना कमी दरात खाद्यपदार्थ, तसेच बाहेरील खाद्यपदार्थ चित्रपटगृहामध्ये नेण्यास परवानगी देण्यास सुरुवात केली नाही, तर मनसे स्टाईलने आंदोलनाचा इशारा या वेळी देण्यात आला.चित्रपटगृहाच्या कॅन्टीनमधील खाद्यपदार्थांचे दर हे सर्वसामान्यांना परवडणारे असावेत. त्याचप्रमाणे, पॅकबंद खाद्यपदार्थ एम.आर.पी.च्या दराने विकले जावेत, असे राज्य सरकारने या आधीच पावसाळी अधिवेशनात स्पष्ट केले आहे, परंतु असे असूनही मल्टिप्लेक्स चालक या नियमांचे पालन करत नसल्याने, मनसे कार्यकर्ते येत्या ७ दिवसांत आक्रमक होतील, असेही या वेळी सांगण्यात आले.‘लोकमत’मुळे मनमानी कारभार आला समोरगुरवारी ‘लोकमत’ने मुंबईतील सर्व विभागांतील महत्त्वाच्या मल्टिप्लेक्समध्ये जाऊन चालक नियमांप्रमाणेच काम करत आहेत का? याचा रिअ‍ॅलिटी चेक केला होता. यात मल्टिप्लेक्स चालक नियमांना हरताळ फासताहेत, असे आढळून आले होते.‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीचा आधार घेत, मनसेचे विभाग अध्यक्ष विजय लिपारे यांनी जयहिंद चित्रपटगृहामध्ये धडक दिली. ‘लोकमत’ने विस्तृतपणे माहिती दिल्याने जनतेसमोर मल्टिप्लेक्स चालकांचा मनमानीपणा ठळक पद्धतीने समोर आला, असेही विजय लिपारे यांनी या वेळी बोलताना सांगितले.

टॅग्स :मुंबईमनसे