मुंबई : नानाजी देशमुख प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात सात जिल्ह्यातील १,०११ गावांची निवड केली असून १०६ गावांच्या कामांचे प्रत्यक्षात नियोजन करण्यात आले आहे, असे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी येथे सांगितले. प्रकल्पाच्या वर्ल्ड ट्रेड सेंटर येथील नूतनीकरण करण्यात आलेल्या कार्यालयाचे उद्घाटन कृषिमंत्र्यांच्या हस्ते झाले. राज्यमंत्री सदाभाऊ खोत उपस्थित होते. प्रकल्पाबाबत आढावा बैठक झाली.कृषिमंत्री म्हणाले, जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने राज्यातील १५ जिल्ह्यांतील १५५ तालुक्यांतील ५,१४२ गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यापैकी ९३२ खारपाण पट्ट्यातील गावे आहेत. त्याचा फायदा १७ लाख शेतकऱ्यांना होणार आहे. प्रथम टप्प्यात उस्मानाबादमधील ४३, अमरावतीमध्ये २१०, बुलडाणातील ९१, यवतमाळमधील ५४, वर्धा येथील १०, अकोल्यातील ८९, वाशिममधील २९ अशा १३१ गाव समूहातील १,०११ गावांची निवड केली आहे.प्रकल्पासाठी गावांचे सूक्ष्म नियोजन, ग्राम कृषी संजीवनी समिती, खारपान जमिनीचे प्रश्न यावर बैठकीत चर्चा झाली. प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक विकास रस्तोगी यांनी सादरीकरण केले.
‘कृषी संजीवनी’च्या पहिल्या टप्प्यात ७ जिल्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 6:19 AM