महाआवास अभियानात  ७ लाख ४१ हजार घरकुले, १ मेपर्यंत मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2021 04:56 AM2021-04-02T04:56:33+5:302021-04-02T04:57:06+5:30

राज्यातील ग्रामीण भागात २० नोव्हेंबर २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत महाआवास अभियानात प्रधानमंत्री आवास योजना व राज्य पुरस्कृत घरकुल योजनांमधून ७ लाख ४१ हजार ५४५ घरकुलांचे बांधकाम हाती घेण्यात आले.

7 lakh 41 thousand households in Maha Awas Abhiyan, extension till 1st May | महाआवास अभियानात  ७ लाख ४१ हजार घरकुले, १ मेपर्यंत मुदतवाढ

महाआवास अभियानात  ७ लाख ४१ हजार घरकुले, १ मेपर्यंत मुदतवाढ

Next

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात २० नोव्हेंबर २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत महाआवास अभियानात प्रधानमंत्री आवास योजना व राज्य पुरस्कृत घरकुल योजनांमधून ७ लाख ४१ हजार ५४५ घरकुलांचे बांधकाम हाती घेण्यात आले.
यापैकी ३ लाख ६२१ घरकुले बांधून पूर्ण करण्यात आली आहेत, तर ४ लाख ४० हजार ९२४ घरकुलांचे बांधकाम प्रगतिपथवर आहे. प्रगतिपथावर असलेल्या घरकुलांचे बांधकाम चालू महिन्याअखेर पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. ग्रामीण भागात अभियानाला मिळालेले यश पाहता अभियानास १ मे २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचेही मुश्रीफ यांनी जाहीर केले.

Web Title: 7 lakh 41 thousand households in Maha Awas Abhiyan, extension till 1st May

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.