Join us

महाआवास अभियानात  ७ लाख ४१ हजार घरकुले, १ मेपर्यंत मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2021 4:56 AM

राज्यातील ग्रामीण भागात २० नोव्हेंबर २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत महाआवास अभियानात प्रधानमंत्री आवास योजना व राज्य पुरस्कृत घरकुल योजनांमधून ७ लाख ४१ हजार ५४५ घरकुलांचे बांधकाम हाती घेण्यात आले.

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात २० नोव्हेंबर २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत महाआवास अभियानात प्रधानमंत्री आवास योजना व राज्य पुरस्कृत घरकुल योजनांमधून ७ लाख ४१ हजार ५४५ घरकुलांचे बांधकाम हाती घेण्यात आले.यापैकी ३ लाख ६२१ घरकुले बांधून पूर्ण करण्यात आली आहेत, तर ४ लाख ४० हजार ९२४ घरकुलांचे बांधकाम प्रगतिपथवर आहे. प्रगतिपथावर असलेल्या घरकुलांचे बांधकाम चालू महिन्याअखेर पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. ग्रामीण भागात अभियानाला मिळालेले यश पाहता अभियानास १ मे २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचेही मुश्रीफ यांनी जाहीर केले.

टॅग्स :घरमहाराष्ट्र सरकार