Join us

सीबीडीत ७ लाखांची चोरी

By admin | Published: December 04, 2014 1:16 AM

सीबीडी येथे बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात घरफोडीची घटना घडली आहे. कार्यालय चार दिवस बंद असताना प्रसाधनगृहाच्या खिडकीतून आत प्रवेश करून चोरट्याने ७ लाख रुपये चोरले.

नवी मुंबई : सीबीडी येथे बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात घरफोडीची घटना घडली आहे. कार्यालय चार दिवस बंद असताना प्रसाधनगृहाच्या खिडकीतून आत प्रवेश करून चोरट्याने ७ लाख रुपये चोरले.खारघर सेक्टर १५ येथील शालीमार सोसायटीत बांधकाम व्यावसायिक सुशील राटा यांचे कार्यालय आहे. २९ नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान हे कार्यालय बंद होते. या दरम्यान कार्यालयाच्या प्रसाधनगृहाच्या खिडकीची काच फोडून चोरट्याने आत प्रवेश मिळवला. त्यानुसार कार्यालयातील कपाटामधील ७ लाख ३४ हजार रुपयांची रोख रक्कम व ऐवज चोरुन नेला. बुधवारी संध्याकाळी राटा यांच्या निदर्शनास हा प्रकार आला.सीबीडी पोलीस ठाण्यात नोंद झाली.(प्रतिनिधी)