एलिव्हेटेडवरून ७ लाख लोक प्रवास करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2016 02:45 AM2016-07-27T02:45:27+5:302016-07-27T02:45:27+5:30

वांद्रे ते विरार पट्ट्यातील लोकल प्रवाशांचा प्रवास सुकर करतानाच रस्ते वाहतुकीवरील ताणही कमी होण्यासाठी वांद्रे ते विरार एलिव्हेटेड प्रकल्प चांगलाच उपयोगी पडणार आहे.

7 million people will travel from the elevated | एलिव्हेटेडवरून ७ लाख लोक प्रवास करणार

एलिव्हेटेडवरून ७ लाख लोक प्रवास करणार

googlenewsNext

मुंबई : वांद्रे ते विरार पट्ट्यातील लोकल प्रवाशांचा प्रवास सुकर करतानाच रस्ते वाहतुकीवरील ताणही कमी होण्यासाठी वांद्रे ते विरार एलिव्हेटेड प्रकल्प चांगलाच उपयोगी पडणार आहे. एलिव्हेटेड प्रकल्प प्रवाशांच्या सेवेत दाखल होताच सुरुवाच्या वर्षात ७ लाख ३0 हजार प्रवाशांची वाहतूक होईल. ही वाहतूक करण्यासाठी आठ डब्यांच्या एसी लोकल चालविण्यात येतील.
चर्चगेट-विरार एलिव्हेटेड प्रकल्पाला कात्री देत हा प्रकल्प दोन टप्प्यांत एमआरव्हीसीकडून पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिला टप्पा वांद्रे ते विरार आणि दुसरा टप्पा वांद्रे ते चर्चगेट असा पूर्ण केला जाईल. पहिल्या टप्प्यातील प्रकल्पामुळे वांद्रे ते विरारदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चांगलाच दिलासा मिळणार आहे. सध्या पश्चिम रेल्वेमार्गावरून वर्षाला ३५ ते ४0 लाख प्रवासी प्रवास करतात. वांद्रे येथून एलिव्हेटेड प्रकल्प सुरू होताच जवळपास ७ लाख ३0 हजार प्रवाशांची त्यातून वाहतूक होईल. हे सर्व प्रवासी सध्याच्या लोकल फेऱ्यांमधून तेथे वळते होतील, असे सर्वेक्षणातून सांगण्यात आले आहे. त्यामुळे लोकल प्रवास सुकर होईल, अशी आशा व्यक्त करण्यात आलीआहे. एलिव्हेटेड प्रकल्प २0१७ साली पूर्ण करून २0२२ साली प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल. सुरुवातीला सात लाखांपेक्षा जास्त प्रवाशांनी प्रवास केल्यानंतर त्याची क्षमता दहा वर्षांनी वाढत जाईल. नंतरच्या दहा वर्षांत जवळपास एकूण ९ लाख ३0 हजार प्रवासी प्रवास करतील आणि दर दहा वर्षांनी दोन ते अडीच लाख प्रवाशांची त्यात भर पडत जाईल. एलिव्हेटेड प्रकल्प प्रवाशांच्या सेवेत येताच आठ डब्यांची एसी लोकल सेवेत आणली जाईल. सर्व लोकल या एसी लोकलच चालविण्यात येणार असल्याचे एमआरव्हीसीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. (प्रतिनिधी)

- दोन टप्प्यांत प्रकल्प पूर्ण केला जाणार असून, यात वांद्रे ते विरार एलिव्हेटेड प्रकल्पाचा प्राथमिक अहवाल नुकताच रेल्वे बोर्ड आणि राज्य सरकारला सादर करण्यात आला. मात्र दुसरा टप्पा असलेला वांद्रे
ते चर्चगेट एलिव्हेटेड प्रकल्प पूर्ण करण्याचा त्यानंतर विचार होईल की नाही यात शंका असल्याचे
सांगण्यात आले.
- चर्चगेट ते वांद्रेदरम्यान मेट्रो-३चा जाणारा समांतर प्रकल्प आणि एलिव्हेटेडसाठी नसलेली जागा पाहता दुसरा टप्पा पूर्ण होईल की नाही हे सध्यातरी सांगणे कठीण असल्याचे एमआरव्हीसीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून स्पष्ट करण्यात आले.

Web Title: 7 million people will travel from the elevated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.