Join us

८७ लाखांच्या स्कॅनियात ७0 लाखांची सजावट

By admin | Published: September 25, 2015 2:44 AM

प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एसटी महामंडळाने स्वत:च्या एसी बस विकत घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार स्कॅनिया आणि व्होल्वो कंपनीच्या एसी बस एसटीच्या ताफ्यात येणार आहेत

सुशांत मोरे , मुंबईप्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एसटी महामंडळाने स्वत:च्या एसी बस विकत घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार स्कॅनिया आणि व्होल्वो कंपनीच्या एसी बस एसटीच्या ताफ्यात येणार आहेत. यातील स्कॅनिया कंपनीच्या दोन बस मुंबई एअरपोर्ट ते पुणे मार्गावर चालवण्यात येणार असून या मार्गावरील प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी बसमधील अंतर्गत सजावटीत बदल केला जाणार आहे. ८७ लाख किंमतीच्या स्कॅनिया कंपनीच्या बसमध्ये केला जाणारा अंतर्गत सजावटीवरील खर्च हा प्रत्येकी तब्बल ७0 लाख रुपये एवढा असेल, असे एसटीतील सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे एसटीकडून ही एकप्रकारे उधळपट्टीच केली जाणार असल्याने एका वेगळ्याच चर्चेला एसटीत उधाण आले आहे. स्कॅनिया कंपनीच्या ३७ आणि व्होल्वो कंपनीच्या ३३ बस विकत घेण्यात येणार असून व्होल्वो कंपनीच्या २२ बस एसटीच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. तर स्कॅनिया कंपनीच्या दोन बस दाखल झाल्या असून त्यांची सध्या मुंबई-पुणे आणि ठाणे-पुणे मार्गावर धावत आहेत. या दोन बस चाचणीत यशस्वी झाल्यानंतर ऊर्वरीत स्कॅनिया कंपनीच्या बस एसटीच्या ताफ्यात दाखल होतील, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. तत्पूर्वी ऊर्वरीत येणाऱ्या स्कॅनिया बसपैकी दोन बस या मुंबई एअरपोर्ट ते पुणे या नविन मार्गावर चालवण्यात येणार आहेत. सध्या या मार्गावर एसटीची सेवा नसल्याने महामंडळाने त्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. हे पाहता एअरपोर्टवरुन पुण्याला जाणारा प्रवासी हा उच्च श्रेणीतील असल्याने त्याला आकर्षित करण्यासाठी पेन्ट्रीसह अन्य दर्जेदार सुविधा या बसमध्ये देण्याचानिर्णय महामंडळाने घेतला आहे. त्यासाठी करण्यात येणाऱ्यासजावटीत चहा, कॉफी, नाश्ता, पाणी उपलब्ध व्हावे यासाठी एक पॅन्ट्री कार देतानाच अन्य बदल केले जाणार आहेत.