Join us  

तळोजा, रत्नागिरीसह ७ प्रकल्पांना हिरवा कंदील; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय, रोजगार किती?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 6:40 AM

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्यातील सात मोठ्या प्रकल्पांना मंगळवारी मंत्रिमंडळाकडून मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये तळोजासह रत्नागिरी येथील ...

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्यातील सात मोठ्या प्रकल्पांना मंगळवारी मंत्रिमंडळाकडून मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये तळोजासह रत्नागिरी येथील एका प्रकल्पाचा समावेश आहे.

कोणते प्रकल्प? रोजगार किती?

तळोजा (नवी मुंबई) आणि पुणे येथे आरआरपी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीमार्फत सेमी कंडक्टर चिप्स निर्मितीचा एकात्मिक प्रकल्प. महाराष्ट्रातला हा पहिलाच सेमी कंडक्टर निर्मिती करणारा प्रकल्प. या प्रकल्पात प्रथम टप्प्यात १२ हजार कोटींची गुंतवणूक. ४,००० पेक्षा अधिक रोजगार निर्मिती. दुसऱ्या टप्प्यामध्ये एवढीच गुंतवणूक. महापे, नवी मुंबई येथे प्रकल्पाचे काम सुरू झाले असून, प्रायोगिक तत्त्वावर सप्टेंबर २०२४ पर्यंत सुरू होईल.

रत्नागिरी येथे हिंदुस्थान कोका कोला बेव्हरेजमार्फत फळाचा पल्प आणि रस यावर आधारित उत्पादन निर्मितीचा विशाल प्रकल्प. १,५०० कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे.

नागपूर भागात जेएसडब्ल्यू एनर्जी पीएसपी इलेव्हन लि. यांचा लिथियम बॅटरी निर्मितीचा अतिविशाल प्रकल्प.     असून त्यात २५ हजार कोटींची  गुंतवणूक आणि ५,००० रोजगार निर्मिती होणार आहे.

छत्रपती संभाजीनगर येथे जेएसडब्ल्यू ग्रीन मोबिलिटी लि. कंपनीचा इलेक्ट्रिक आणि हायब्रीड वाहन निर्मितीचा पहिलाच अतिविशाल प्रकल्प. या प्रकल्पात एकूण २७ हजार २०० कोटी रुपये गुंतवणूक. ५,२०० पेक्षा अधिक रोजगार निर्मिती. या प्रकल्पात वार्षिक ५ लाख इलेक्ट्रिक प्रवासी कार व १ लाख व्यावसायिक कार निर्मितीचे नियोजन  आहे.

बुटीबोरी, नागपूर आणि पनवेल येथील भोकरपाडा एमआयडीसी परिसरात आवाडा इलेक्ट्रो कंपनीचा सोलर पीव्ही मॉड्युल्स आणि इलेक्ट्रोलायझरचा एकात्मिक प्रकल्प येणार असून कंपनीमार्फत नवीकरणीय ऊर्जा स्रोताचा उच्च तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प राज्यात स्थापित होणार आहे.  बुटीबोरी, नागपूर येथे परनॉर्ड रिकार्ड इंडिया प्रा. लिमिटेड मार्फत मद्यार्क निर्मितीचा विशाल प्रकल्प. प्रकल्पात १,७८५ कोटी रुपये गुंतवणूक अपेक्षित आहे.

 

टॅग्स :राज्य सरकारगुंतवणूक