मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असतानाच आता महापालिकेची प्रशासकीय यंत्रणाही जोमाने कामाला लागली आहे. कर्मचारी आणि अधिकारी वर्गाच्या फौजफाट्यासह साहित्य सामग्रीसाठी महापालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये एकूण ७ हजार ३०४ मतदान केंद्रे उभारण्यात येणार असून, या सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक त्या प्रमाणात कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट व ‘मेमरी’ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त अजय मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका मुख्यालयात आयोजित मासिक आढावा बैठकीत यासंदर्भात चर्चा करण्यात आली असून, अधिकारी व कर्मचारी वर्गाला सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन, अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांच्यासह महापालिकेचे सर्व संबंधित उपायुक्त, सहायक आयुक्त व विभाग प्रमुख आदी उपस्थित होते. निवडणूक प्रक्रियेमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नेमणुका व कर्तव्ये याबाबत बैठकीदरम्यान आढावा घेण्यात आला. शपथपत्रे महापालिकेच्या संकेतस्थळावर७ फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येऊ शकेल. ८ फेब्रुवारी रोजी चिन्हवाटप होणार आहे. त्यादृष्टीनेदेखील आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्याचे तसेच नामनिर्देशनासह उमेदवारांची शपथपत्रे महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.निवडणूक प्रशिक्षण निवडणूक कार्यक्रम पार पाडण्यासाठी संबंधितांना आवश्यक ते प्रशिक्षण देण्यात येत आहे. सदर प्रशिक्षण हे शहर भाग, पूर्व उपनगरे व पश्चिम उपनगरे येथे प्रत्येकी दोन ठिकाणी अशा प्रकारे एकूण ६ ठिकाणी देण्यात येत आहे. ३० जानेवारीपासून प्रशिक्षण देण्यात येत आहे.संगणकीय सादरीकरणमहापालिका सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या मासिक बैठकीदरम्यान उपायुक्त बापू पवार यांनी निवडणूक प्रक्रिया, कार्यवाही व तयारी याबाबतची माहिती संगणकीय सादरीकरणासह उपस्थितांना दिली.३ हजार ५०० वाहनेमतदान प्रक्रियेसाठी निवडणूक अधिकारी यांच्या विभागानुसार वाहन व्यवस्था करण्यात येणार आहे. याअंतर्गत साधारणपणे ३ हजार ५००पेक्षा अधिक वाहनांची व्यवस्था असणार आहे.मतदान केंद्रांवर प्रथमच ‘प्रथमोपचार पेटी’बैठकीच्या आढाव्यानुसार, सर्व म्हणजे ७ हजार ३०४ मतदान केंद्रांवर या वेळी प्रथमच ‘प्रथमोपचार पेटी’देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नामनिर्देशनसाठी लागणारे साहित्य यापूर्वीच वाटप करण्यात आले आहे. तसेच कॅन्डसेट साहित्य, मतदान साहित्य, मतमोजणी साहित्य व मतदान जनजागृती साहित्य वाटप याविषयीचा आढावा बैठकीत घेण्यात आला. तसेच या सर्व बाबी नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण कराव्यात, असेही आदेश आयुक्तांनी बैठकीदरम्यान दिले.६८१ क्षेत्रीय अधिकारी प्रत्येक प्रभागासाठी ३ याप्रमाणे २२७ प्रभागांसाठी एकूण ६८१ क्षेत्रीय अधिकारीदेखील निवडणूक प्रक्रियेसाठी कार्यरत असणार आहेत.निवडणूक प्रकियेसाठी ४४ हजार ५६४ कर्मचारी निवडणूक कार्यक्रमाकरिता साधारणपणे ४० हजार ५१३ कर्मचारी, तर ४ हजार ५१ राखीव कर्मचारी असणार आहेत. यानुसार ४४ हजार ५६४ कर्मचारी निवडणूक प्रकियेसाठी कार्यरत असणार आहेत.आचारसंहितेसाठी पथकेआचारसंहितेचे पालन करण्यासाठी विविध पथके तयार करण्यात आली आहेत. त्यात १३ स्टॅटीक पथके, ९८ भरारी पथके; तर ३९ व्हिडीओ सर्व्हेलियन्स पथके यांचा समावेश आहे. ही सर्व पथके उपायुक्त (अतिक्रमण निर्मूलने) यांच्या नियंत्रणाखाली असणार आहेत.२४ तास चालणारा नियंत्रण कक्षमहापालिकेच्या सर्व २४ विभाग कार्यालयांमध्ये २४ तास चालणारा नियंत्रण कक्षदेखील स्थापन करण्यात आला आहे. तर अनुज्ञापन अधीक्षक यांच्या नियंत्रणाखाली मुख्य आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला आहे.व्हिडीओ व्ह्युव्हिंग चमू कार्यरत : उपायुक्त (अतिक्रमण निर्मूलने) हे आदर्श आचारसंहिता कक्षाचे प्रमुख अधिकारी आहेत. तर विभाग पातळीवर सहायक आयुक्त हे आचारसंहिता कक्षाचे प्रमुख आहेत. सर्व विभाग कार्यालयांत भरारी पथके, व्हिडीओ सर्व्हेलन्स पथके; तसेच व्हिडीओ व्ह्युव्हिंग चमू कार्यरत राहणार आहेत.
मुंबईत ७ हजार ३०४ मतदान केंद्रे
By admin | Published: February 06, 2017 3:46 AM