मुंबईत काेराेनाचे ७ हजार ८९२ सक्रिय रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:08 AM2021-01-03T04:08:32+5:302021-01-03T04:08:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर ९३ टक्क्यांवर पोहोचला असून रुग्ण दुपटीचा कालावधी ३६१ ...

7 thousand 892 active patients of Kareena in Mumbai | मुंबईत काेराेनाचे ७ हजार ८९२ सक्रिय रुग्ण

मुंबईत काेराेनाचे ७ हजार ८९२ सक्रिय रुग्ण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर ९३ टक्क्यांवर पोहोचला असून रुग्ण दुपटीचा कालावधी ३६१ दिवसांवर पोहोचला आहे. सध्या ७ हजार ८९२ सक्रिय रुग्ण आहेत. दिवसभरात ६९५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत २ लाख ७४ हजार ७६७ रुग्णांनी कोरोनाला हरविले आहे.

शनिवारी ६९५ रुग्णांचे निदान झाले असून सात मृत्यूंची नोंद झाली. बाधितांची एकूण संख्या २ लाख ९४ हजार ६९५ झाली असून बळींचा आकडा ११ हजार १३२ झाली आहे. शहर, उपनगरातील चाळ व झोपडपट्टीच्या वस्तीत सक्रिय कंटेन्मेंट झोन्सची संख्या २८३ असून एकूण सक्रिय कंटेन्मेंट झोन्स २ हजार ४६२ इतके आहेत. मागील २४ तासांत पालिकेने रुग्णांच्या सहवासातील अतिजोखमीच्या २ हजार ८९५ सहवासितांचा शोध घेतला आहे.

.....................

Web Title: 7 thousand 892 active patients of Kareena in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.