Join us

मुंबईत काेराेनाचे ७ हजार ८९२ सक्रिय रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2021 4:08 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर ९३ टक्क्यांवर पोहोचला असून रुग्ण दुपटीचा कालावधी ३६१ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर ९३ टक्क्यांवर पोहोचला असून रुग्ण दुपटीचा कालावधी ३६१ दिवसांवर पोहोचला आहे. सध्या ७ हजार ८९२ सक्रिय रुग्ण आहेत. दिवसभरात ६९५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत २ लाख ७४ हजार ७६७ रुग्णांनी कोरोनाला हरविले आहे.

शनिवारी ६९५ रुग्णांचे निदान झाले असून सात मृत्यूंची नोंद झाली. बाधितांची एकूण संख्या २ लाख ९४ हजार ६९५ झाली असून बळींचा आकडा ११ हजार १३२ झाली आहे. शहर, उपनगरातील चाळ व झोपडपट्टीच्या वस्तीत सक्रिय कंटेन्मेंट झोन्सची संख्या २८३ असून एकूण सक्रिय कंटेन्मेंट झोन्स २ हजार ४६२ इतके आहेत. मागील २४ तासांत पालिकेने रुग्णांच्या सहवासातील अतिजोखमीच्या २ हजार ८९५ सहवासितांचा शोध घेतला आहे.

.....................