अवैध वाहतुकीमुळे ७ हजार कोटींचा फटका

By admin | Published: May 6, 2016 02:52 AM2016-05-06T02:52:28+5:302016-05-06T02:52:28+5:30

अवैध वाहतुकीमुळे एसटीला वर्षाला ७ हजार कोटींचा आर्थिक फटका बसत आहे. हा फटका बसत असल्याने अवैध वाहतुकीला प्रतिबंध घालण्यासाठी एसटीकडून

7 thousand crores of rupees due to illegal traffic | अवैध वाहतुकीमुळे ७ हजार कोटींचा फटका

अवैध वाहतुकीमुळे ७ हजार कोटींचा फटका

Next

मुंबई : अवैध वाहतुकीमुळे एसटीला वर्षाला ७ हजार कोटींचा आर्थिक फटका बसत आहे. हा फटका बसत असल्याने अवैध वाहतुकीला प्रतिबंध घालण्यासाठी एसटीकडून प्रयत्न केले जाणार आहेत.
राज्यात एसटी महामंडळाच्या बसमधून वर्षाला ७0 ते ७२ लाखांच्या दरम्यान प्रवासी प्रवास करत आहेत. मात्र गेल्या तीन वर्षांत हे प्रवासी कमी झाले आहेत. राज्यात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वडापसारख्या अवैध वाहतुकीमुळेच हा फटका बसत असल्याचे एसटीचे अधिकारी सांगतात. वडापसारख्या जीप, रिक्षा, खाजगी बसेस या एसटीच्या आगार आणि स्थानक हद्दीत येऊन प्रवाशांना घेऊन जात आहेत. एसटीच्या २00 मीटर परिसरात खाजगी वाहनांना बंदी असतानाही त्यांच्याकडून बिनदिक्कतपणे वावर वाढला आहे. त्यामुळे महामंडळाच्या तिजोरीवर चांगलाच परिणाम होताना दिसतो. महामंडळाला २0१४-१५मध्ये १ हजार ६८५ कोटी रुपयांचा संचित तोटा झाला होता. आता २0१५-१६मध्ये याच तोट्यात आणखी ३00 कोटी रुपयांची भर पडली आहे. दुसरीकडे महामंडळाला वर्षाला ७ हजार कोटींच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागत असल्याचे एसटीतील सूत्रांनी सांगितले. एसटीचे उत्पन्न वर्षाला सात ते साडेसात हजार कोटी आहे. अवैध वाहतूक थांबल्यास एसटीच्या तिजोरीत आणखी तब्बल ७ हजार कोटी रुपयांची भर पडेल. तसेच एसटीला संचित तोट्यातूनही बाहेर पडण्यास मदत मिळेल.

महामंडळाला वर्षाला
७ हजार कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसत असल्याचा ढोबळ अंदाज आम्ही बांधला आहे. अवैध वाहतूक रोखण्यासाठी आरटीओ, वाहतूक पोलीस आणि एसटी महामंडळाकडून पुरेपूर प्रयत्न केले जात आहेत.
- रणजीत सिंह देओल (एसटी महामंडळ : उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक)

Web Title: 7 thousand crores of rupees due to illegal traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.