रतींद्र नाईकमुंबई :
संपूर्ण मुंबईचा डोलारा सांभाळणाऱ्या मुंबई महापालिकेचे पोट पालिका मुख्यालयातील उपाहारगृहाद्वारे भरले जाते. मात्र याच उपाहारगृहातून गेल्या वर्षभरात जेवणाची ताटे, चमचे, ग्लास अशी हजारो भांडी गायब झाली आहेत. पालिकेतील कर्मचारी, अधिकारी जेवण, नाश्ता आपल्या कार्यालयात मागवितात. परंतु खाल्ल्यानंतर ही भांडी उपाहारगृहाला परत करतच नाहीत. कॅन्टीनच्या कर्मचाऱ्यांनी भांडी मागितल्यास घरातून आणल्याचे सांगितले जाते. या बनवाबनवीमुळे उपाहारगृह चालक मेटाकुटीला आले असून भांडी परत करण्याचे आवाहन त्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना केले आहे.
पालिकेच्या मुख्यालयात ५० पेक्षा जास्त कार्यालय असून मुख्यालयाच्या तळमजल्यावर १०० माणसे सहज बसतील इतके मोठे उपाहारगृह आहे. अनेक महिन्यांपासून हे उपाहारगृह श्रीसिद्धिविनायक कॅटरर्समार्फत चालविले जाते. चविष्ट आणि अल्प दरात सकाळ, संध्याकाळ नाश्ता, दुपारी जेवण उपाहारगृहाकडून पुरविण्यात येत असल्याने अनेक कर्मचारी या ठिकाणी येतात. दररोज जेवणासाठी दुपारी या ठिकाणी कर्मचाऱ्यांचीच नव्हे पालिकेतील अधिकाऱ्यांचीही वर्दळ असते.
ही भांडी हरवलीचमचे ६ ते ७ हजारलंच प्लेट १५० ते २०० नाश्ता प्लेट ३०० ते ४०० ग्लास १०० ते १५०भांडी घेऊन जाऊ नकाउपाहारगृहातून हजारो चमचे, ताटे, ग्लास गायब झाल्याने यापुढे उपाहारगृहाबाहेर भांडी घेऊन जाऊ नका, असे आवाहन कर्मचारी, अधिकाऱ्यांना केले आहे. तसा फलकही लावला आहे. ५० हजारांचे नुकसानपालिकेतील काही कर्मचारी अधिकारी जेवण, नाश्ता आपल्या कार्यालयात मागवितात. जेवण झाल्यानंतर भांडी कार्यालयात तशीच ठेवली जातात ती परत केली जात नाहीत. त्यामुळे वर्षभरात हजारो भांडी कमी झाली असून ४० ते ५० हजारांचे नुकसान झाल्याची माहिती कॅन्टीन चालकाकडून देण्यात आली.