राज्यात आज कोरोनाचे ७० रुग्ण, मुंबईत ६ नवे; राज्यातील रुग्णसंख्या ७३१
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2024 21:19 IST2024-01-01T21:15:40+5:302024-01-01T21:19:22+5:30
मुंबईत जे ६ रुग्ण सापडले आहेत, त्यापैकी १ रुग्णास आज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

राज्यात आज कोरोनाचे ७० रुग्ण, मुंबईत ६ नवे; राज्यातील रुग्णसंख्या ७३१
संतोष आंधळे
मुंबई : राज्यात काही दिवसांपासून नवीन रुग्ण सापडण्यास सुरूवात झाली आहे. त्यामध्ये सोमवारी राज्यात एकूण ७० नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यातील ६ रुग्ण हे मुंबई शहरातील आहेत. त्यामुळे राज्यात ७३१ आणि मुंबईत १३० कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. तसेच आज ३२ जण बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
मुंबईत जे ६ रुग्ण सापडले आहेत, त्यापैकी १ रुग्णांला आज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शहरात सध्याच्या घडीला कोरोनाकरिता राखीव असणाऱ्या ४२१५ बेड्सपैकी १५ बेड्सवर रुग्ण दाखल आहेत. दिवसभरात १२६ चाचण्या करण्यात आल्या. ‘जेएन १’ या व्हेरिएंटचा एकही रुग्ण आ०ढळून आलेला नाही.
नव्याने नोंद झालेले महामुंबईतील रुग्ण
मुंबई मनपा - ६
ठाणे - ०
ठाणे मनपा - १२
नवी मुंबई मनपा - १७
उल्हासनगर मनपा - १
रायगड -३
पनवेल मनपा - १