Join us

७० टक्के कर्जमाफी २५ नोव्हेंबरपर्यंत, बँकांकडून झाल्या चुका

By अतुल कुलकर्णी | Published: October 27, 2017 6:52 AM

मुंबई : बँकांनी नोंदी करताना चुका केल्या, त्याचा फटका पात्र शेतकºयांना बसला. कर्जमाफीच्या याद्या दुरुस्तीचे काम सुरू असून, २५ नोव्हेंबरपर्यंत ७० टक्के शेतक-यांना कर्जमाफी मिळेल, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.

मुंबई : बँकांनी नोंदी करताना चुका केल्या, त्याचा फटका पात्र शेतक-यांना बसला. कर्जमाफीच्या याद्या दुरुस्तीचे काम सुरू असून, २५ नोव्हेंबरपर्यंत ७० टक्के शेतक-यांना कर्जमाफी मिळेल, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. शेवटच्या शेतकºयांना कर्जमाफी मिळावी, यासाठी लक्ष घालत असल्याने अनेकांचा खोटेपणा उघड होत आहे, असेही ते म्हणाले.दिवाळीत कर्जमाफीची प्रमाणपत्रे शेतकºयांना दिली. पण त्यांच्या खात्यात पैसेच गेले नाहीत, हे वृत्त ‘लोकमत’ने गुरुवारी प्रकाशित केले होते. त्याविषयी मुख्यमंत्री म्हणाले, आम्ही ६६ कॉलमचा फॉर्म तयार केला आहे. तो भरताना बँकांकडे शेतकºयांचा आधार नंबर नव्हता. नसलेली माहिती भरू नका, असे सांगितले होते. पण तिथे ‘नॉट अ‍ॅप्लिकेबल’ असे लिहिल्याने अर्ज बाद होण्याच्या शक्यतेमुळे काही बँकांनी एकच आधार क्रमांक अनेक शेतकºयांच्या नावापुढे टाकला. काही ठिकाणी नवरा-बायकोचाही एकच आधार नंबर टाकला गेला. ही बाब लक्षात आल्यानंतर कार्यक्रमाच्या आधीच आम्ही त्यात दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार दुरुस्तीही सुरू झाली.>रेटण्याचा केला प्रयत्नकाही जिल्हाधिकाºयांनी अर्ज भरलाच आहे म्हणून काही शेतकºयांना बोलावले. दिवाळीत ७०० शेतकºयांना प्रमाणपत्रे दिली. त्यातील ५५० शेतकरी योग्य निघाले तर १५० शेतकºयांची तपासणी बाकी असताना बोलावल्याचे तर पाच शेतकºयांनी पात्र नसताना अर्ज केल्याचे समोर आल्याचे फडणवीस म्हणाले. आपण बँक अधिकाºयांची बैठक घेतली. बँक व सरकारच्या पातळीवर आवश्यक सुधारणा करीत आहोत. सरकार तपशिलात जाईल असे बँकांना वाटले नव्हते. त्यामुळे काहीबँकांनी माहिती रेटून नेण्याचे प्रयत्न केले. पण ते या सिस्टीममध्ये उघडे पडले, असे फडणवीस म्हणाले. याद्या बिनचूक होताच शेतकºयांच्या खात्यात पैसे जमा होतील. सरकारने आयसीआयसीआय बँकेत४ हजार कोटी रुपये जमा केले आहेत. त्यातून ही रक्कम दिली जाईल. सहकार सचिव एस.एस. संधू यांनी दिरंगाई केल्याची माहिती आता नाही, पण दोषींना वाचवले जाणार नाही. - मुख्यमंत्रीमंत्र्यांसह सर्व विषयांवर केले भाष्यभाजपा-शिवसेना सरकारला ३१ आॅक्टोबर रोजी ३ वर्षे पूर्णहोत आहेत. त्यानिमित्ताने लोकमतला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील ते माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यापर्यंत सर्वांवर भाष्य केले. मंत्र्यांच्या कामाविषयी समाधानी आहे का हेही सांगितले.सविस्तर मुलाखत : रविवारच्या अंकात

टॅग्स :देवेंद्र फडणवीस