मुंबई : वास्तवदर्शी अर्थसंकल्प मांडल्यानंतर सहामाहीतच विकासकामांवर २३ टक्के निधी खर्च केल्याचा दावा पालिका प्रशासन करीत आहे. मात्र, २०१५ ते २०१७ या दोन वर्षांत आरोग्य, शिक्षण, रस्ते, उद्यान आणि घनकचरा व्यवस्थापन या मूलभूत सुविधांसाठी राखीव निधीही पालिकेने खर्च केला नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामुळे ६० ते ७० टक्के निधी गेली दोन वर्षे खर्च न होताच वाया जात असल्याचे दिसून आले आहे.विकासकामांसाठी राखीव ७० टक्के तरतूद दरवर्षी वाया जात असल्याने, तिच रक्कम पुढच्या अर्थसंकल्पात दाखवून आकडा फुगविण्यात येत होता. मात्र, या आर्थिक वर्षात अर्थसंकल्प ३७ हजार कोटींवरून थेट २५ हजार कोटींवर आणण्यात आला, तसेच सन २०१४-२०३४ या विकास आराखड्यातील तरतुदींसाठी अर्थसंकल्पात निधी राखून ठेवत, त्यानुसार कामाला सुरुवात केली. त्यामुळे भांडवली खर्चासाठी राखीव आठ हजार १२१ कोटी रकमेपैकी ३० सप्टेंबर २०१७ पर्यंत सुमारे २३.७९ टक्के म्हणजेच १,९३१.९९ कोटी रुपये एवढी रक्कम खर्च झाली. कमी वेळेत निधीचा योग्य विनियोग केल्याची शाबासकी प्रशासन मिळवत आहे. मात्र, विकास कामावर निधी खर्च करण्याची ही तत्परता पालिकेने यापूर्वी दाखविली नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.मुंबईचे आरोग्य ठणठणीत राहावे यासाठी दरवर्षी मुंबई महानगरपालिका अर्थसंकल्पात वाढ करताना दिसते. तरीही १८ ते २२ टक्केच निधी मुंबईच्या आरोग्यावर खर्च झाला आहे. शिक्षण विभागात खर्चाचा आकडा तुलनेत अधिक आहे. विकासकामासाठी राखीव निधी, असा वाया जात असल्याने, काँग्रेसने आंदोलनाचा इशारा दिला आहे.>खाते खर्चाची तरतूद केलेला खर्च टक्केवारीआरोग्य ७९४.३० १४८.०६ १८.६४शिक्षण ३५७.१४ १२५.२० ३५.०६रस्ते ३००७.७० १६४८.७४ ५४.८२उद्यान ४२८.३७ २३५.८३ ५५.०५घनकचरा ३७८.६६ ६० १५.८५>खाते खर्चाची तरतूद केलेला खर्च टक्केवारीआरोग्य ९०४.६४ २०४११.०६ २२.५६शिक्षण ३२४.५८ १८६.४० ५४.४३रस्ते २८८६ ४५८.६० १५.८९उद्यान ३८३.८१ ३४१.३१ ७५.१५घनकचरा २३७.३७ ८९.९१ ३७.८४
पालिकेकडून विकासकामांचा ७० टक्के निधी गेला वाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 6:00 AM