Join us

प.रे आणि म.रेवर ७० लिफ्ट

By admin | Published: February 07, 2017 5:28 AM

वृद्ध प्रवासी आणि गरोदर स्त्रियांना पादचारी पूल चढताना होणारा मनस्ताप पाहता, रेल्वे प्रशासनाकडून स्थानकांमध्ये लिफ्ट बसवण्यात येत आहेत

मुंबई : वृद्ध प्रवासी आणि गरोदर स्त्रियांना पादचारी पूल चढताना होणारा मनस्ताप पाहता, रेल्वे प्रशासनाकडून स्थानकांमध्ये लिफ्ट बसवण्यात येत आहेत. यंदाच्या वर्षात संपूर्ण पश्चिम आणि मध्य रेल्वे स्थानकांवर एकूण ७0 लिफ्ट बसतील. त्यासाठी अर्थसंकल्पातून निधीही मिळाला आहे. यंदाच्या वर्षात आणखी काही लिफ्ट बसवण्याचे नियोजन रेल्वेकडून करण्यात आले आहे. ए-१, ए श्रेणीच्या आणि अन्य तीर्थक्षेत्र असणाऱ्या स्थानकांवर लिफ्ट बसवण्यात येतील. यात मध्य रेल्वे मार्गावरील स्थानकांवर ४0 तर पश्चिम रेल्वे मार्गावरील स्थानकांवर ३0 लिफ्ट बसवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. त्यासाठी रेल्वे अर्थसंकल्पात ३ कोटी ४0 लाख ८४ हजार रुपये मंजूर करण्यात आले. यात मध्य रेल्वेसाठी १ कोटी ८५ लाख ८४ हजार, तर पश्चिम रेल्वेसाठी १ कोटी ५५ लाख मंजूर केले आहेत. (प्रतिनिधी)