जिल्ह्यातील धरणांमध्ये ७० मिमी पाऊस

By admin | Published: July 4, 2014 03:48 AM2014-07-04T03:48:47+5:302014-07-04T03:48:47+5:30

मुंबई, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, मीरा-भार्इंदर, वसई-विरार महापालिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा, मोडकसागर, आंध्रा, बारवी, वांद्री आणि सूर्या या प्रमुख धरणांमध्ये आज ७० मिमी पाऊस पडला

70 mm rain in dams in the district | जिल्ह्यातील धरणांमध्ये ७० मिमी पाऊस

जिल्ह्यातील धरणांमध्ये ७० मिमी पाऊस

Next

ठाणे : मुंबई, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, मीरा-भार्इंदर, वसई-विरार आदी महापालिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा, मोडकसागर, आंध्रा, बारवी, वांद्री आणि सूर्या या प्रमुख धरणांमध्ये आज ७० मिमी पाऊस पडला. या धरणांमध्ये जूनपासून आतापर्यंत ८८५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
सध्या भातसा धरणात २७.९० टक्के पाणीसाठा आहे. याप्रमाणेच धामणीत ४५, कवडासमध्ये ९६, वांद्रीत १.७०, आंध्रा २१.८०, मोडकसागरमध्ये ४५.३८, तानसात ८.९३ तर बारवीत १२.१० टक्के पाणीसाठा आहे. धरण क्षेत्रात तुरळक प्रमाणात होत असलेला पाऊस शहरी, ग्रामीण भागांत आज १६५.७० मिमी पाऊस पडला. भातसा धरणातील पाण्यावर १५ मेगावॅट वीजनिर्मिती केली जाते. मात्र, हा पाणीसाठा १०७ मी. खालावला असून ही पातळी अजून खाली गेल्यास वीजनिर्मिती बंद होईल.

Web Title: 70 mm rain in dams in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.