Join us

देशात ७० टक्के डॉक्टर विविध हिंसेचे बळी!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2019 6:18 AM

देशातील ७० टक्के डॉक्टर्स शारीरिक, मानसिक, शाब्दिक हिंसेचे बळी ठरत असल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आली.

मुंबई - देशातील ७० टक्के डॉक्टर्स शारीरिक, मानसिक, शाब्दिक हिंसेचे बळी ठरत असल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आली. या ंविरोधात ठोस कारवाईसाठी इंडियन मेडिकल असोसिएशनने राज्य शासनाला निवेदन दिले. तसेच, पोलीस यंत्रणेलाही या हल्ल्यासंबंधी गुन्हे दाखल करण्यासाठी पत्र लिहिले.अंधेरी येथे शुक्रवारी पार पडलेल्या चर्चासत्रात इंडियन मेडिकल असोसिएशनचे सरचिटणीस डॉ. जयेश लेले म्हणाल की, सरकारी, पालिका, खासगी रुग्णालयांत डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांविरोधात ठोस तरतूद नाही. ३० ते ४० टक्के डॉक्टर्स अशा पद्धतीच्या हिंसेला बळी पडत आहेत. ६० टक्के निवासी डॉक्टर शासकीय रुग्णालय, दवाखान्यांत या हल्ल्यांचे बळी ठरतात, तर ३० टक्के खासगी डॉक्टरांनाही हल्ल्यांना सामोरे जावे लागते. यात शारीरिक हिंसा, मानसिक दबाव, शाब्दिक पद्धतीनेही हिंसा आहे.बºयाचदा रुग्णालयांत होणाºया हल्ल्यांमागे रुग्णाचे बिल हे प्रमुख कारण असते. शहरी भागात याचे प्रमाण अधिक आहे, असेही डॉ. लेले यांनी सांगितले.

टॅग्स :डॉक्टरभारत