७० टक्के पोलिसांना तंबाखूचे व्यसन

By admin | Published: May 21, 2015 01:17 AM2015-05-21T01:17:28+5:302015-05-21T01:17:28+5:30

पोलिसांमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण ७० टक्के असून ३५ टक्के पोलिसांमध्ये कर्करोगाच्या शक्यतेची लक्षणे दिसून आल्याचे कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशनने (सीपीएए) केलेल्या सर्वेक्षणात समोर आले आहे.

70 percent of the police addiction to tobacco | ७० टक्के पोलिसांना तंबाखूचे व्यसन

७० टक्के पोलिसांना तंबाखूचे व्यसन

Next

मुंबई : दिवस-रात्र सर्वांच्या सुरक्षेसाठी सज्ज असणाऱ्या पोलिसांमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण ७० टक्के असून ३५ टक्के पोलिसांमध्ये कर्करोगाच्या शक्यतेची लक्षणे दिसून आल्याचे कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशनने (सीपीएए) केलेल्या सर्वेक्षणात समोर आले आहे. कामाचा ताण, दीर्घ रात्रपाळी अशा सबबी पुढे करून पोलीस तंबाखू सेवन करत असल्याचे दिसून आले.
तंबाखू अथवा तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे मुखाचा, घशाचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो. अनेक वर्षे तंबाखू खाल्ल्याने कर्करोग होण्याचा धोका असल्याचे माहीत असूनही अनेक जण सवय न मोडता सबबी पुढे करणे पसंत करतात. त्याच प्रकारे काही पोलीस सबब देत असल्याचे पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
सीपीएएने नायगाव, दिंडोशी, वरळी, मरिन ड्राइव्ह, ताडदेव, मलबार हिल, बीकेसी आणि दादर पोलीस ठाण्यातील ३ हजार पोलिसांची आरोग्य तपासणी केली होती. या वेळी त्यांनी पोलिसांशी संवाद साधला. यातूनच ही निरीक्षणे तयार करण्यात आली आहेत. तीन हजार पोलिसांची तपासणी केल्यावर ७० टक्के पोलिसांना तंबाखूचे सेवन करण्याची सवय आहे, असे दिसून आल्याचे सर्वेक्षणातून समोर आले. यावर तोडगा म्हणजे सुरुवातीपासूनच पोलीस शिपाई, अधिकाऱ्यांना तंबाखू सेवनापासून परावृत्त केले पाहिजे, असे सीपीएएच्या कार्यकारी संचालिका अनिता पीटर यांनी सांगितले.
तणाव असला तरीही तंबाखू सेवन करणे हा योग्य पर्याय नाही. कर्करोगाचे वाढते प्रमाण सर्वश्रुत आहे. यामुळे पोलिसांनी स्वत: व्यसनांपासून दूर राहण्याची आवश्यकता असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. (प्रतिनिधी)

तंबाखूचा वाढता धोका
च्तंबाखू अथवा तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे मुखाचा, घशाचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो.
च्कर्करोगाचे वाढते प्रमाण सर्वश्रुत आहे. यामुळे पोलिसांनी स्वत: व्यसनांपासून दूर राहण्याची आवश्यकता असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

Web Title: 70 percent of the police addiction to tobacco

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.