तलावांमध्ये ७० टक्के जलसाठा जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:07 AM2021-07-29T04:07:33+5:302021-07-29T04:07:33+5:30

मुंबई : तलाव क्षेत्रातील मुसळधार पावसाने मुंबईतील पाण्याचे टेन्शन मिटविले आहे. जुलै अखेरीस तलावांमध्ये ७० टक्के म्हणजेच २६६ दिवसांचा ...

70% water storage in lakes | तलावांमध्ये ७० टक्के जलसाठा जमा

तलावांमध्ये ७० टक्के जलसाठा जमा

Next

मुंबई : तलाव क्षेत्रातील मुसळधार पावसाने मुंबईतील पाण्याचे टेन्शन मिटविले आहे. जुलै अखेरीस तलावांमध्ये ७० टक्के म्हणजेच २६६ दिवसांचा जलसाठा जमा झाला आहे. आतापर्यंत मोडक सागर, तानसा, तुळशी आणि विहार हे चार तलाव भरले आहेत.

मुंबईत महापालिकेमार्फत दररोज तीन हजार ८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. वर्षभर पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी तलावांमध्ये १ ऑक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर जलसाठा असणे आवश्यक असते. १५ जुलैपर्यंत तलावांमध्ये जेमतेम १७ टक्के जलसाठा शिल्लक होता. त्यामुळे पाणी कपात लागू करण्याची तयारी पालिका प्रशासनाने केली होती.

दरम्यान, मागील १० ते १२ दिवसांमध्ये मुंबईसह ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. यामुळे तलाव क्षेत्रात जलसाठा वाढत आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व तलावांमध्ये मिळून सध्या दहा लाख १३ हजार दशलक्ष लिटर जलसाठा जमा झाला आहे. त्यामुळे पाणी संकट निवळले आहे. सर्व तलाव भरून वर्षभराचा कोटा पूर्ण होण्यासाठी केवळ ३० टक्के जलसाठा कमी आहे.

२८ जुलैची जलसाठ्याची आकडेवारी(मीटर्समध्ये)

तलाव..कमाल.. किमान ...उपायुक्त साठा (दशलक्ष) सध्या

मोडक सागर १६३.१५ १४३. २६ १२८९२५ १६३.१५

तानसा १२८.६३ ११८.८७ १४३७६९ १२८.५६

विहार ८०.१२ ७३.९२ २७६९८.....८०.२२

तुळशी १३९.१७ १३१.०७ ८०४६ ..१३९.२०

अप्पर वैतरणा ६०३.५१ ५९५.४४ १०९१९५...५९९.७६

भातसा १४२.०७ १०४.९० ४६३८१८ ...१३२.००

मध्य वैतरणा २८५.०० २२०.०० १३२४१९ ..२७४.२७

वर्ष.....जलसाठा (दशलक्ष लिटर)...टक्के

२०२१ - १०१४८७०

२०२० - ४७३११३

२०१९- १०८९१५४

Web Title: 70% water storage in lakes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.