७० वर्षीय नागरिकाने वाचविले चौघांचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 03:23 AM2018-12-20T03:23:09+5:302018-12-20T03:23:30+5:30
मुंबईत ४६ वे अवयवदान यशस्वी
मुंबई : अंधेरी पश्चिम येथील चार बंगला येथील ७० वर्षीय चंद्रकांत तारे यांनी अवयवदान करुन चार रुग्णांना जीवनदान दिले आहे. मुंबईच्या क्रिटीकेअर मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात सोमवारी हे अवयवदान पार पडले. मुंबईतील ४६ वे अवयवदान आहे. १६ डिसेंबर तारे यांचा अंधेरी येथे अपघात झाला. त्यांना तात्काळ क्रिटीकेअर रुग्णालयात मात्र त्यावेळी डॉक्टरांनी ब्रेनडेड घोषित केले. त्या परिस्थितीत तारे यांच्या मुलीने अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, फुफ्फुस, यकृत, आणि दोन मूत्रपिंड हे अवयव दान करण्यात आले. या व्यक्तीचे फुफ्फुस अंधेरीतील खासगी रुग्णालयात तर, यकृत ठाण्यातील रुग्णालयात आणि दोन्ही मूत्रपिंड खंबाला हिल येथील खासगी रुग्णालयात दान करण्यात आले. शिवाय, त्यांचे हृदय आणि त्वचा देखील दान करण्यात येणार होती. पण, त्यासाठी खूप उशीर झाल्याचे सांगत ते नाही दान करता येणार नाही अशी माहिती कुटुंबियांनी दिली.
याविषयी रुग्णालयाचे समन्वयक समीर मोरे यांनी सांगितले की, जिल्हा अवयव प्रत्यारोपण समितीच्या निमयावलीनुसार चंद्रकांत मोरे यांचे अवयव ५० ते ६० वर्ष वयोगटातील व्यक्तींनाच दान करण्यात आले आहेत. त्यांचे अवयव वेगवेगळ्या तीन रुग्णालायांत दान केले आहेत.
२३ वे हृदय प्रत्यारोपण यशस्वी
च्मुलूंडच्या रूग्णालयात ही हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. विशाखापट्टणला राहणाऱ्या १७ वर्षीय तरूणाच्या अवयवदानाने मुंबईतील ५२ वर्षीय व्यक्तीला नवसंजीवनी दिली आहे.
च्हृदय प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. अन्वय मुळे आणि त्यांच्या टीमने ही प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे. ही यंदाच्या वषार्तील २३ वी यशस्वी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होती.