70 वर्षांनंतर महात्मा गांधी हत्येच्या आरोपातून स्वातंत्र्यवीर सावरकरांची निर्दोष मुक्तता

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2018 07:00 PM2018-04-05T19:00:38+5:302018-04-05T19:00:38+5:30

70 वर्षांनंतर महात्मा गांधी हत्येच्या आरोपातून स्वातंत्र्यवीर सावरकरांची निर्दोष मुक्तता सर्वोच्च न्यायालयाने केली असून, मात्र पुनर्सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाची नकार दिला आहे.

70 years after the acquittal of Swatantryaveer Savarkar for the murder of Mahatma Gandhi assassination | 70 वर्षांनंतर महात्मा गांधी हत्येच्या आरोपातून स्वातंत्र्यवीर सावरकरांची निर्दोष मुक्तता

70 वर्षांनंतर महात्मा गांधी हत्येच्या आरोपातून स्वातंत्र्यवीर सावरकरांची निर्दोष मुक्तता

googlenewsNext

- मनोहर कुंभेजकर
मुंबई- 70 वर्षांनंतर महात्मा गांधी हत्येच्या आरोपातून स्वातंत्र्यवीर सावरकरांची निर्दोष मुक्तता सर्वोच्च न्यायालयाने केली असून, मात्र पुनर्सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाची नकार दिला आहे. 30 जानेवारी 1948 रोजी झालेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या हत्येची पुनर्निवेदना करण्याची मागणी अभिनव भारत या संस्थेने केली होती. या संस्थेचे विश्वस्त, प्रसिद्ध लेखक आणि संशोधक डॉ. पंकज फडणीस यांनी ही याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर उत्तर देताना 1948 मध्ये घडलेल्या या हत्येच्या घटनेत स्वातंत्र्यवीर सावरकरांना निर्दोष मुक्त केले आहे. यासाठी फडणीस यांनी गेली अडीच वर्षे हा लढा दिला. केंद्र सरकारच्या न्याय व विधी मंत्रालयाकडे त्यांनी या प्रकरणी दाद मागितली होती. मात्र याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात त्यांची याचिका फेटाळली गेली. अखेर सर्वोच्य न्यायालयात त्यांनी याचिका दाखल केल्यावर त्यांना यश मिळाले आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांची 70 वर्षांनंतर निर्दोष मुक्तता झाली, असे त्यांनी अभिमानाने सांगितले.

वीर सावरकरांच्या अनुयायांकडून चालवली जाणारी डॉ. फडणीस अँड ट्रस्ट ही न्यास संस्था असून या संस्थेतर्फे क्रांतिकारकांच्या नावाची चिन्हे आणि नावे (अनुचित प्रयोग प्रतिबंधक) कायदा 1950 या अनुसूचीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव समाविष्ट करण्याची आग्रही मागणी फडणीस यांनी केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार डॉ. फडणीस यांची गांधीजींच्या हत्येच्या पुनर्तपासणीची मागणी फेटाळून लावली असली तरी विविध कारणांमुळे या प्रकरणाला महत्त्व प्राप्त झाले आहे. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांना या प्रकरणात चुकीच्या पद्धतीने गोवले गेले, असा दावा त्यांनी केला होता. स्वातंत्र्यवीर सावरकरांना गांधी हत्येसाठी दोषी ठरवणाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाची ही चपराक आहे, असे ठाम मत फडणीस आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक समितीचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी आज समितीच्या शिवाजी पार्क येथील झालेल्या एका पत्रकार परिषदेत दिली. हा ऐतिहासिक निकाल जल्लोष दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय आम्ही घेतला असून स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकावर विद्युत रोषणाई करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

डॉ. फडणीस यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात किरकोळ फेरबदल करण्याची विनंतीवजा याचिका न्यायालयात दाखल करण्याचा विचार केला असून ही बाबत आपण लावून धरणार असल्याची माहिती  त्यांनी दिली. 1948 साली झालेल्या गांधीजींच्या खुनाप्रकरणी प्रसिद्ध भारतीय क्रांतिकारक वीर सावरकर यांच्यावरही कटात सामील झाल्याचे आरोप करण्यात आले होते. परंतु 28 मार्च 2018 रोजीपर्यंत सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला कोणीही आव्हान न दिल्यामुळे आता सावरकरांची निर्दोष मुक्तता करण्यात आली असून त्यांचा या हत्येशी कोणताही संबंध नव्हता असे जाहीर करण्यात येत आहे. 

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, डॉ. फडणीस यांची गांधीजींच्या हत्येच्या पुनर्तपासणीची मागणी फेटाळून दिली असली तरी, विविध कारणांमुळे त्याला प्रचंड महत्व प्राप्त झाले आहे. सर्वप्रथम, महात्मा गांधींच्या हत्येत सावरकरांचा कथित सहभाग असल्याचा आरोप हाच तीव्र सार्वजनिक वादविवाद आणि मतभेदांचा केंद्रबिंदू होता. या निर्णयामुळे या वादविवादाला आता पूर्णविराम मिळेल. आणि, येत्या काळातही या सुनावणीचे राजकीय, सामाजिक आणि ऐतिहासिक प्रतिसाद दिसून येतील. दुसरे म्हणजे, सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट केले आहे की, गांधी हत्येतील फोर-बुलेट सिद्धांताला नाकारता येत नसले तरीही या प्रकरणाचे परिणाम आणि विवादास्पद स्वभाव यामुळे ते सिद्धांत स्वीकारण्यास न्यायालय तयार नाही. डॉ. फडणीस यांनी सांगितले की, न्यायालयाने फोर बुलेट थिअरीचे परीक्षण केले तर, गांधी हत्या प्रकरण हे नेहरूंच्या सार्वभौमत्वाला बळकट करण्यासाठी ब्रिटिशांनी आखलेली एक खेळी असल्याचा निर्णय न्यायालयाने घेतला असता. अशा वादविवादांचे निकाल न्यायालयात होऊ शकत नाहीत. 

या प्रकरणाला सत्त्याची लढाई असे संबोधत तेव्हा त्या पुढे म्हणाले की, त्यांनी आता न्यायालयात काही चुकीच्या फेरबदलांची मागणी करणारी आढावा याचिका दाखल केली आहे. परंतु हे प्रकरण बाजूला ठेवण्यासारखे नव्हे. त्यानंतर ते कायद्यातील सुयोग्य बदलाचा प्रचार करण्यासाठी आपल्या संविधानिक अधिकारांचा वापर करण्याची योजना आखत आहेत. यामुळे फोर बुलेट्सच्याबाबतीत वादाला विराम द्यावा की तो तार्किक निष्कर्षांपर्यंत तपासला जावा, हे ठरवता येईल असे मत त्यांनी व्यक्त केले.

डॉ. फडणीस येत्या काळात रिइन्व्हेस्टिगेशन इन मर्डर ऑफ महात्मा गांधी अॅन एक्झरसाईज इन फ्युचरिलिटी.. अ क्रिटिक ऑफ द सुप्रीम कोर्ट जजमेंट हे पुस्तक प्रसिद्ध करणार आहेत. या प्रकरणात सुप्रीम कोर्टात सादर केलेल्या प्रकरणाशी संबंधित विस्तृत कागदपत्रांवर हे पुस्तक आधारित असणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. रणजित सावरकर म्हणाले की, या प्रकरणात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना गोवणे चुकीचे होते, मात्र एका ताकदवान नेत्याच्या आरोपींमुळे सावरकर यांना विनाकारण गोवले गेले, असा आरोप त्यांनी केला.अजूनही सावरकर यांना बदनाम करण्याची कारस्थाने सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

Web Title: 70 years after the acquittal of Swatantryaveer Savarkar for the murder of Mahatma Gandhi assassination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.