मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मध्य रेल्वे मार्गावर रोज ४५३ लोकल फेऱ्या चालवण्यात येत आहेत. यात आणखी अतिरिक्त फेऱ्यांची भर पडणार असून लवकरच मध्य रेल्वे मार्गावर ७०० फेऱ्या चालविण्यात येतील, असे प्रशासनाने म्हटले आहे.
सर्वसामान्यांनी मास्क आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे बंधन पाळले तर लोकल प्रवासाची परवानगी देण्यास हरकत नाही, असे राज्य सरकारने उच्च न्यायालयात म्हटले होते. सध्या अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवासाची मुभा आहे. पण रेल्वे गाड्यांच्या फेºया वाढवण्यास हरकत नाही, असेही राज्य सरकारने सांगितले होते. त्यानंतर पश्चिम आणि मध्य रेल्वेने गाड्यांच्या फेऱ्यांत वाढ केली. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर ४२३ फेऱ्या होत होत्या. त्यात १० ऑक्टोबरपासून २२ फेºयांची वाढ करण्यात आली असून आता एकूण ४५३ फेºया चालविण्यात येत आहेत. तर १५ ऑक्टोबरपासून मध्य रेल्वेवरही २८ पर्यंत फेºया वाढविण्यात येतील. दरम्यान पश्चिम रेल्वे मार्गावर १५ ऑक्टोबरपासून आणखी १९४ अतिरिक्त फेºया चालवण्यात येतील. अशा एकूण ७०० फेºया होतील. यात १० एसी लोकल फेºयांचा समावेश आहे.
पश्चिम रेल्वेवर आणखी एक गाडीपश्चिम रेल्वे १७ ऑक्टोबरपासून मुंबई सेंट्रल ते हजरत निजामुद्दीन ऑगस्ट क्रांती राजधानी (दररोज) ही विशेष गाडी चालवणार आहे. मुंबई सेंट्रलवरून ही गाडी सायंकाळी ५.४० वाजता सुटणार असून दुसºया दिवशी ११ वाजता हजरत निजामुुद्दीन येथे पोहोचेल.