टुरिस्ट गाइड बनण्यासाठी ७०० जणांनी घेतले ट्रेनिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:08 AM2021-08-20T04:08:33+5:302021-08-20T04:08:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालयामार्फत घेण्यात येत असलेल्या टूर गाइडविषयक (पर्यटन मार्गदर्शक) ऑनलाइन प्रशिक्षणात आतापर्यंत ...

700 people trained to become tourist guides | टुरिस्ट गाइड बनण्यासाठी ७०० जणांनी घेतले ट्रेनिंग

टुरिस्ट गाइड बनण्यासाठी ७०० जणांनी घेतले ट्रेनिंग

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालयामार्फत घेण्यात येत असलेल्या टूर गाइडविषयक (पर्यटन मार्गदर्शक) ऑनलाइन प्रशिक्षणात आतापर्यंत ७०० हून अधिक युवक-युवतींनी सहभाग घेतला आहे. या प्रशिक्षणात संधी अजूनही उपलब्ध असून पात्र इच्छुकांनी यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी केले आहे.

यशस्वी उमेदवारांना महाराष्ट्र पर्यटन प्रमाणित, परवानाधारक मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्रातील कोणत्याही पर्यटनस्थळांवर (पुरातत्त्व विभागाची सर्व पर्यटनस्थळे वगळता) मार्गदर्शक सेवा देण्याची परवानगी दिली जाईल. अधिक माहितीसाठी http://iitf.gov.in पोर्टलवर भेट द्यावी किंवा diot@maharashtratourism.gov.in या ई-मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने तयार केलेला मार्गदर्शक प्रशिक्षण कार्यक्रम पर्यटन संचालनालयाने स्वीकारला आहे. http://www.iitf.gov.in पोर्टलवर मूळ ऑनलाइन कोर्स हिंदी आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये विविध पर्यटन पैलूंचे सात मॉड्यूल आहेत. एकूण कार्यक्रम नोंदणी शुल्क २ हजार रुपये आहे. एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवार तसेच नंदुरबार, वाशिम, गडचिरोली व उस्मानाबाद या आकांक्षित जिल्ह्यांचे अधिवासित रहिवाशांना नोंदणी शुल्कातून सूट देण्यात आली आहे. परीक्षा शुल्क ५०० रुपये इतके आहे.

Web Title: 700 people trained to become tourist guides

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.