Join us

७,००० रक्तदात्यांनी रक्तपेढीत केले रक्तदान; पहिल्यांदाच मुंबईत अनोखा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2023 5:25 PM

गेल्या आठवड्यातील रविवार मुंबईतील रक्तपेढ्यांसाठी अनोखा असा होता.

मुंबई :

गेल्या आठवड्यातील रविवार मुंबईतील रक्तपेढ्यांसाठी अनोखा असा होता. सुटीचा दिवस असला तरी १४ रक्तपेढ्यात सकाळपासून रक्तदाते रांगेत उभे राहून रक्तदान करत होते. या अशा पद्धतीने शेकडो रक्तदाते रक्त पेढीमध्ये जाऊन रक्तदान करत असल्याचा अनुभव पहिल्यादांच रक्तपेढीचे डॉक्टर आणि कर्माचारी घेत होते. विशेष म्हणजे हा सगळा कार्यक्रम शिस्तबद्ध पद्धतीने सुरू असून कोणताही गोंधळ दिसत नव्हता. रक्तदाते रक्तदान करून निघून जात होते. हे अशा पद्धतीचे रक्तदान शिबिर आयोजित करण्याचे श्रेय जाते ते डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांना एका दिवसात ७०००पेक्षा अधिक दात्यांनी मुंबईतील रक्तपेढ्यांमध्ये जाऊन रक्तदान केले.

सर्वसाधारणपणे रक्तदान शिबिर आयोजित करणाऱ्या सामाजिक संस्था आपल्या ठिकाणी रक्तपेढ्यांना बोलावून शिबिर आयोजित करत असतात. रक्तदाते त्या ठिकाणी रक्तदान करत असतात. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने (रेवदंडा, ता. अलिबाग, जि. रायगड) रक्तदात्यांना रक्तपेढीत जाऊन रक्तदान करण्याचे आवाहन केले होते.

यामध्ये विशेषकरून मुंबईतील १४ याप्रकरणी राज्य रक्त संक्रमण परिषदेचे सहसंचालक डॉ. महेंद्र केंद्रे यांनी सांगितले की, "डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. मात्र, यावेळी त्यांनी त्यांच्या रक्तदात्यांना रक्तपेढीत जाऊन रक्तदान करण्यास सांगितले होते. हे या शिबिराचे वेगळेपण यावेळी दिसून आले. दिवसभरात शहरातील रक्तपेढ्यांमध्ये ७०००पेक्षा अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. यामध्ये रक्तपेढ्यांचा मोठा त्रास वाचला असून, रक्त घटक बनविण्याची जी प्रक्रिया होती ती त्यांना तत्काळ सुरू करता आली. रक्तपेढ्यांनी सहभाग दर्शविला असून, त्यामध्ये शासकीय आणि अशासकीय रक्तपेढ्यांचा समावेश होता.

टॅग्स :रक्तपेढीमुंबई