Join us

वैद्यकीय प्रवेशातील ७०:३० कोटा पद्धत रद्द; मंत्री अमित देशमुख यांची विधानसभेत घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2020 1:39 AM

आता ‘वन महाराष्ट्र, वन मेरिट’

मुंबई : राज्यातील आरोग्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशामध्ये ७० टक्के प्रादेशिक कोटा आणि ३० टक्के राज्यस्तर कोटा या धर्तीवर यापूर्वी प्रवेश करण्यात येत होते. मात्र आता ही पद्धत रद्द करण्यात आली असल्याने ‘वन महाराष्ट्र, वन’ मेरिट अशी वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया असेल, अशी घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी विधानसभेत केली.

यापूर्वी उर्वरित महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ असे तीन प्रादेशिक विभाग करण्यात आलेले होते, ज्या प्रादेशिक विभागातून उमेदवार १२ वी परीक्षा उत्तीर्ण झालेला असेल त्या उमेदवारांसाठी त्यांच्या संबंधित प्रादेशिक विभागातील महाविद्यालयामध्ये ७० टक्के जागा राखीव असत. तसेच ३० टक्के जागा ह्या संपूर्ण 

दोन्ही बाजूंनी बाकेवाजवून स्वागत

या पद्धतीमुळे उच्च गुणवत्ता असूनही तेथील उमेदवारांना त्यांच्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळत नव्हता. त्यामुळे त्यांच्या नाराजी होती. आज हा अन्याय दूर झाला आहे, असे देशमुख यांनी सांगितले. त्यांच्या घोषणेचे दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी बाके वाजवून स्वागत केले.

टॅग्स :शिक्षणअमित देशमुखमहाराष्ट्र