मुंबई: राज्यात गेल्या 24 तासांत 704 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 699 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आज 16 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12% एवढा आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची 66,43,883 इतकी झाली आहे. राज्यातील एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 64,92, 504 इतकी झाली आहे.
राज्यात सध्या 75,313 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 855 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या 6,441 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, मुंबई आणि पुण्यानंतर ओमायक्रॉन या व्हेरियंटने उपराजधानी नागपूरमध्ये शिरकाव केला आहे. नागपूर महानगर पालिका आयुक्त राधाकृष्णन यांनी याबाबतची माहिती दिली आहे. नागपूरमध्ये 40 वर्षीय व्यक्तीला ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झाल्याचं त्यांनी सांगितलं. ओमायक्रोन पॉसिटीव्ह आढळलेल्या 40 वर्षीय रुग्णाचा पश्चिम आफ्रिकेतील प्रवासाचा इतिहास आहे.
महाराष्ट्रात ओमिक्रॉन (Omicron) या नवीन विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांचा आकडा वाढत असतानाच, मोठा दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. आतापर्यंत राज्यात 18 रुग्ण ओमिक्रॉनबाधित असल्याचे स्पष्ट झाले असून, त्यापैकी 9 रुग्णांना आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती राज्यातील आरोग्य विभागाने दिली आहे.
दरम्यान, कोरोना व्हायरसचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनचा ( Omicron) संसर्ग भारतातही आढळून आला आहेत. या नवीन व्हेरिएंटने भारतासह जगाची चिंता वाढवली आहे. डेल्टाच्या संसर्गाचा वेग खूप अधिक होता. यामध्ये रुग्णांना सौम्य आणि गंभीर अशी दोन्ही लक्षणे दिसत होती. त्यामध्ये तीव्र ताप, खोकला. श्वास घेण्यास त्रास, छातीमध्ये वेदना, रक्तामध्ये ऑक्सिजनची कमतरता यासारखी लक्षणे दिसत होती. आता कोरोनाचा नवा ओमायक्रॉन व्हेरिएंट जगासमोर नवे आव्हान बनून समोर आला आहे. त्याचे गांभीर्य, संसर्गाचा वेग आणि लक्षणांबाबत वेगवेगळे दावे करण्यात येत आहे.