मुंबईत सील इमारती ७ हजार ९९ तर कटेनमेंट झोन ५६८
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2020 03:39 PM2020-09-06T15:39:55+5:302020-09-06T15:40:28+5:30
कोरोनाचा बिमोड केला जात असला तरी...
मुंबई : कोरोनाचा बिमोड केला जात असला तरी अद्यापही मुंबई महापालिकेला पुर्णत: यात यश आलेले नाही. सद्यस्थितीचा विचार करता मुंबईत ७ हजार ९९ इमारती सील असून, कटेनमेंट झोनची संख्या ५६८ एवढी आहे.
मुंबई महापालिकेकडून प्राप्त माहितीनुसार, मुंबईत एकूण ७ हजार ९९ इमारती सील करण्यात आल्या आहेत. यातील एकूण घरांची संख्या २ लाख ११ हजार ६६० आहे. एकूण लोकसंख्या ७ लाख ८६ हजार ४७८ आहे. कोरोना पॉझिटिव्ह प्रकरणांचा आकडा २८ हजार १६९ आहे. सर्वाधिक सील इमारती आर/सी वॉर्डमध्ये असून, हा आकडा १ हजार ३४८ आहे. तर सर्वाधिक कमी सील इमारती ई वॉर्डमध्ये असून, हा आकडा ३७ आहे.
कंटेनमेंट झोनचा विचार करता मुंबईत एकूण ५६८ कंटेनमेंट झोन असून, यातील एकूण घरांची संख्या ८ लाख ४२ हजार ५६३ आहे. तर येथील एकूण लोकसंख्या ३६ लाख ९७ हजार ९६ आहे. एकूण कोरोना पॉझिटिव्ह प्रकरणांचा आकडा ३१ हजार ९६२ आहे. सर्वाधिक कंटेनमेंट झोन एल वॉर्डमध्ये आहेत. हा आकडा ५५ आहे. तर सर्वात कमी कंटेनमेंट झोन बी वॉर्डमध्ये असून, ही संख्या १ आहे.