Join us

जिल्ह्यात 71 टक्के मतदार

By admin | Published: September 13, 2014 10:32 PM

19 लाख 76 हजार 272 नागरिक प्रत्यक्ष मतदार असून त्यांचे मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट आहे.

अलिबाग : रायगड जिल्ह्याची एकूण लोकसंख्या 27 लाख 77 हजार 838 असून त्यापैकी 71.14 टक्के म्हणजे 19 लाख 76 हजार 272 नागरिक प्रत्यक्ष मतदार असून त्यांचे मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट आहे. राज्याचे हे प्रमाण 7क् टक्के आहे. राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून आचारसंहिता लागू झाली आहे. या आचारसंहितेची अंमलबजावणी व विधानसभा निवडणुकीबाबत जिल्ह्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी दक्षतेने व समन्वयाने काम करावे व आचारसंहितेचे काटेकोरपणो पालन करावे, असे आदेश रायगडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सुमंत भांगे यांनी दिली. या वेळी त्यांच्या समवेत अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल, उपजिल्हा निवडणूक अधिकारी विश्वनाथ वेटकोळी आदी उपस्थित होते. 
निवडणुकांमध्ये विशेषत: सार्वजनिक मालमत्तेचे विद्रूपीकरण करण्यास प्रतिबंध करणारा कायदा व निवडणूक आदर्श आचारसंहिता यांचे काटेकोरपणो पालन करण्यास प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले असल्याचे त्यांनी सांगितले. आदर्श आचारसंहितेचा भाग म्हणून निवडणूक कालावधीत भिंती रंगविणो, बॅनर्स, पोस्टर्स, ङोंडे, होर्डिग्ज शासकीय इमारतीवर लावण्यास पूर्णत: प्रतिबंध केलेला आहे. आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी काटेकोरपणो पालन होणो आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
17 सप्टेंबर्पयत म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम तारखेच्या आधी दहा दिवसांर्पयत पात्न उमेदवारांना मतदार नोंदणीसाठी अर्ज सादर करता येईल. त्यानुसार या विधानसभा निवडणुकीसाठी असलेल्या या संधीचा लाभ जास्तीत जास्त पात्न मतदारांनी घ्यावा. याकरिता प्रसारमाध्यमांद्वारे जनजागृती करावी, पथनाटय़, लोककलावंत, पेास्टर, होर्डिंग्ज, दृक्श्रव्य माध्यम याचाही प्रभावीपणो उपयोग मतदार नोंदणीकरिता करण्यात येत असून नागरिकांनीही या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक अधिका:यांनी त्यांच्या मतदारसंघातील परिस्थितीनुसार योग्य तो निर्णय घेऊन तसेच पोलीस व इतर संबंधित विभागाशी समन्वय राखून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याची खबरदारी घ्यावी, असे आदेशही  देण्यात आले. (विशेष प्रतिनिधी)
 
च्कजर्तमध्ये 1 लाख 26 हजार 99 पुरुष तर 1 लाख 16 हजार 351 महिला असे एकूण 2 लाख 42 हजार 45क् मतदार आहेत. 
च्उरणमध्ये 1 लाख 29 हजार 165 पुरुष तर 1 लाख 23 हजार 583 महिला असे एकूण 2 लाख 52 हजार 748 मतदार आहेत. 
च्पेणमध्ये 1 लाख 43 हजार 572 पुरुष तर 1 लाख 38 हजार 71 महिला असे एकूण 2 लाख 81 हजार 643 मतदार आहेत. 
च्अलिबागमध्ये 1 लाख 38 हजार 489 पुरुष तर 1 लाख 37 हजार 338 महिला असे एकूण 2 लाख 75 हजार 827 मतदार आहेत. 
च्श्रीवर्धनमध्ये 1 लाख 17 हजार 776 पुरुष तर 1 लाख 22 हजार 639 महिला असे एकूण 2 लाख 4क् हजार 315 मतदार आहेत. 
च्महाडमध्ये 1 लाख 33 हजार 468 पुरुष तर 1 लाख 32 हजार 893 महिला असे एकूण 2 लाख 66 हजार 361 मतदार आहेत.
 
पनवेल सर्वात मोठा मतदारसंघ
रायगड जिल्ह्यात एकूण सात विधानसभा मतदारसंघ असून त्यातील सर्वात मोठा विधानसभा मतदारसंघ पनवेल आहे. या मतदारसंघात 2 लाख 23 हजार 152 पुरुष तर 1 लाख 93 हजार 776 महिला असे एकूण 4 लाख 16 हजार 928 मतदार आहेत.