मुंबई : राज्यात मागील २४ तासांत रुग्ण निदानाच्या तुलनेत रुग्ण बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. राज्यात दिवसभरात ७१ हजार ९६६ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर आतापर्यंत ४५ लाख ४१ हजार ३९१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यात ५ लाख ५८ हजार ९६६ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
राज्यात दिवसभरात ४० हजार ९५६ रुग्ण आणि ७९३ मृत्यूंची नोंद झाली आहे. आता राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५१ लाख ७९ हजार ९२९ झाली असून बळींचा आकडा ७७ हजार १९१ आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७.६७ टक्के असून मृत्युदर १.४९ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ९८ लाख ४८ हजार ७९१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७.३५ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ३५ लाख ९१ हजार ७८३ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर २९ हजार ९५५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
दिवसभरात नोंद झालेल्या ७९३ मृत्यूंपैकी ४०३ मृत्यू हे मागील ४८ तासांतील, तर १७० मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित २२० मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक काळापूर्वीचे आहेत. या ७९३ मृत्यूंमध्ये मुंबई ५१, ठाणे १४, ठाणे मनपा ९, नवी मुंबई मनपा १०, भिवंडी निजामपूर मनपा ४, वसई विरार मनपा ५, रायगड १२, पनवेल मनपा १३, नाशिक ३७, नाशिक मनपा ५३, मालेगाव मनपा ३, अहमदनगर १६, अहमदनगर मनपा ८, धुळे ३, धुळे मनपा ८, जळगाव २, नंदूरबार ११, पुणे २३, पुणे मनपा १८, पिंपरी चिंचवड मनपा २, सोलापूर २८, सोलापूर मनपा २, सातारा २०, कोल्हापूर १४, कोल्हापूर मनपा ३, सांगली १३, सांगली मिरज कुपवाड मनपा ३, सिंधुदुर्ग १२, रत्नागिरी १८, औरंगाबाद १, औऱंगाबाद मनपा १, जालना २६, परभणी ११, परभणी मनपा ४, लातूर ३२, लातूर मनपा ६, उस्मानाबाद १५, बीड ६१, नांदेड ३०, नांदेड मनपा ११, अकोला ५, अकोला मनपा ९, अमरावती १४, अमरावती मनपा ९, यवतमाळ १२, वाशिम ९, नागपूर ९, नागपूर मनपा ५६, वर्धा ८, भंडारा १४, गोंदिया ६, चंद्रपूर २०, गडचिरोली ९ आदी रुग्णांचा समावेश आहे.
जिल्हानिहाय सक्रिय रुग्ण आकडेवारी
जिल्हासक्रिय रुग्ण
पुणे ९५,७३१
नागपूर ५३,०२०
मुंबई ४०,१६२
ठाणे ३१,४४६
नाशिक २६,८०६