Join us

ऑलआउट ऑपरेशनअंतर्गत ७१५ हॉटेल, लॉजची झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 4:07 AM

७,४२६ वाहनांची तपासणी : २१३ ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशनलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गुन्हेगार आणि बेकायदा कारवायांविरोधात मुंबई पोलिसांनी ...

७,४२६ वाहनांची तपासणी : २१३ ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : गुन्हेगार आणि बेकायदा कारवायांविरोधात मुंबई पोलिसांनी राबविलेल्या ऑलआउट ऑपरेशनअंतर्गत ३ तासांत मुंबईतील ७१५ हॉटेल, लॉज तसेच मुसाफिर खान्याची झाडाझडती घेण्यात आली. तर ११२ ठिकाणी केलेल्या नाकाबंदीत ७ हजार ४२६ वाहनांची तपासणी करण्यात आली.

मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली कायदा व सुव्यवस्थेचे सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. यात, पाचही प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त, १३ परिमंडळाचे पोलीस उपायुक्त आणि सर्व पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या उपस्थितीत बुधवारी रात्री ११ ते मध्यरात्री २ पर्यंत हे ऑपरेशन सुरू होते.

यादरम्यान मुंबईत ११२ ठिकाणी नाकाबंदी करून ७ हजार ४२६ वाहनांची तपासणी करण्यात आली. ११२ ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले. ४३९ ठिकाणी पायी गस्त घालण्यात आली. यात, गंभीर गुन्ह्यांतील १ हजार ४४८ गुन्हेगार तपासण्यात आले. २३८ आरोपी हाती लागले असून त्यापैकी ९३ आरोपींवर कारवाई करण्यात आली.

* ३३ फरार आरोपींसह १० तडिपारांना बेड्या

ड्रग्ज संबंधित ९ कारवाया करण्यात आल्या. या ऑपरेशनदरम्यान १४ अवैध शस्त्रे पाेलिसांनी जप्त केली. ३३ फरार आणि पाहिजे आरोपींसह १० तडिपार आरोपींनाही बेड्या ठोकण्यात आल्या. याशिवाय २७ अजामीन वॉरंटची बजावणीही करण्यात आली.

------------------------------